AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC सिव्हिल सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC CSE 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या वर्षी राजस्थानमधील अनुज अग्निहोत्रीने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे.

UPSC सिव्हिल सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात प्रथम
| Updated on: Mar 06, 2026 | 3:22 PM
Share

UPSC CSE Final Result 2025 Declared : संघ लोकसेवा आयोग (UPSC) ने आज शुक्रवारी सिव्हिल सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या प्रतिष्ठित परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा, तर आकांक्षा धूल यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे.

या वर्षी एकूण 958 पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यापैकी 180 उमेदवारांची निवड Indian Administrative Service (IAS) साठी झाली आहे.

टॉप 10 मध्ये कोण?

UPSC सिव्हिल सेवा परीक्षेच्या टॉप 10 मध्ये अनुज अग्निहोत्री, राजेश्वरी सुवे एम आणि आकांश धुल यांच्यासह राघव झुनझुनवाला, ईशान भटनागर, जीनिया अरोड़ा, ए आर राजा मोहद्दीन, पक्षल सेक्रेटरी, आस्था जैन आणि उज्जवल प्रियांक यांचा समावेश आहे.

सिव्हिल सेवा परीक्षेची प्राथमिक परीक्षा 25 मे 2025 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत झाली. अंतिम टप्पा असलेला पर्सनॅलिटी टेस्ट किंवा मुलाखत 5 जानेवारी 2026 पासून सुरू झाला होता आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली.

मुख्य परीक्षेनंतर एकूण 2,736 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील 15 दिवसांत सर्व उमेदवारांचे गुण UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत.

विविध सेवांसाठी निवड

UPSC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वर्षी एकूण 958 पदांवर भरती करण्यात आली आहे. त्यापैकी 180 उमेदवारभारतीय प्रशासनिक सेवा (IAS) साठी, 55 उमेदवार भारतीय विदेश सेवा (IFS) साठी आणि 150 उमेदवार भारतीय पुलिस सेवा (IPS) साठी निवडले गेले आहेत.

IAS च्या 180 पदांपैकी 74 पदे अनारक्षित (General) प्रवर्गासाठी आहेत. तर 28 पदे अनुसूचित जाती (SC), 13 पदे अनुसूचित जमाती (ST), 47 पदे इतर मागासवर्गीय (OBC) आणि 18 पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणेच UPSC सिव्हिल सेवा परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लाखो उमेदवार प्रयत्न करत असतात.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल