AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली? व्हाईट हाऊसमधील त्या व्हिडीओने खळबळ; हादरवणारं सत्य समोर!

Video: सध्या सोशल मीडियावर डोनाल्ट ट्रम्प यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील आहे.

Video: युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली? व्हाईट हाऊसमधील त्या व्हिडीओने खळबळ; हादरवणारं सत्य समोर!
डोनाल्ट ट्रम्पImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 07, 2026 | 3:14 PM
Share

मध्यपूर्वेतील युद्धाने भीषण वळण घेतले आहे. आज (७ मार्च) पर्यंत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आठव्या दिवशीही सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले करत आहेत. हा संघर्ष केवळ इराण आणि इस्रायलपुरता मर्यादित न राहता अमेरिकेलाही गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. अमेरिका इस्रायलला पूर्ण पाठिंबा देत असून, इराणकडून प्रत्युत्तरादाखल आखाती देशांतील अमेरिकी लष्करी तळांवर हल्ले होत आहेत. या युद्धामुळे सर्व पक्षांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे आणि शांतीची गरज सर्वांना जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये एका विशेष प्रार्थना सभेचे आयोजन केले. हा क्षण सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ट्रम्प खुर्चीवर बसून डोळे मिटले

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रम्प ओव्हल ऑफिसमधील त्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला देशभरातील ख्रिश्चन पाद्री आणि धार्मिक नेते उभे आहेत. हे पाद्री एकत्रित प्रार्थना करत असताना ट्रम्प डोळे मिटून प्रार्थनेत सहभागी झालेले दिसत आहेत. काही पाद्रींनी ट्रम्प यांच्या खांद्यावर, हातावर किंवा डोक्यावर हात ठेवले आहेत. ही प्रार्थना राष्ट्राच्या रक्षणासाठी, अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेसाठी आणि ट्रम्प यांना मार्गदर्शन व शक्ती मिळावी यासाठी करण्यात आली.

व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ डॅन स्कॅव्हिनो यांनी हा व्हिडीओ शेअर करत “God Bless the USA” (अमेरिकेला देव आशीर्वाद देवो) असे कॅप्शन लिहिले आहे. अमेरिकन मीडियानुसार, ट्रम्प यांनी देशभरातील अनेक पाद्रींना ओव्हल ऑफिसमध्ये प्रार्थनेसाठी आमंत्रित केले होते. ही प्रार्थना सभा ५ मार्च २०२६ रोजी झाली असून, यात अमेरिकेच्या सैन्याच्या यशासाठी आणि राष्ट्राच्या एकतेच्या दृष्टीने प्रार्थना करण्यात आली.

ट्रम्प यांनी या प्रसंगी पाद्रींशी वैयक्तिक संवाद साधला आणि त्यांच्या प्रार्थनेचे आभार मानले. हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिले गेले असून, यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी याला सकारात्मक पाऊल म्हटले तर काहींनी यावर टीका केली आहे. काहींनी तर हा व्हिडीओ AIच्या माध्यमातून तयार केला असल्याचा दावा केला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच