AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा मंजूर झाला का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?

मीनाक्षी शिंदे यांचा पक्षातील ठाणे महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा स्वीकारला नसल्याचे बोलले जात आहे. याबाबतचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Eknath Shinde : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा मंजूर झाला का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?
eknath shinde Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 7:56 AM
Share

शिंदे सेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला का, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही जण त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याचे बोलत आहेत. तसेच काही जण त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याचेही दावा करत आहेत. याचदरम्यान मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या जोडप्याला अटक व्हावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे. पूर्णेकरांच्या हत्येनंतर 29 दिवसांनी मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणानंतर विविध पक्षातील नेत्यांकडून आरोपींना कडक कारवाईची मागणी केली जात आहे. प्रदीप पूर्णेकरांकडून सातत्याने आरोप होत असताना मीनाक्षी शिंदे यांच्याकडून आरोप फेटाळले जात आहेत. पक्षातील पदाचा राजीनामा, याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यासाठी आरोप केले जात आहेत, त्यांना योग्यवेळी उत्तर देऊ, असे मीनाक्षी शिंदे यांनी स्पष्ट केले.

मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यामागील कारणे अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या आरोपावरूनही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या सर्व मुद्द्यावर मिनाक्षी शिंदे लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा पक्षाकडून मान्य झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पक्षातील काही वरिष्ठांनी दावा केला आहे की, शिंदेसेनेत कोणीही राजीनामा दिला, तर मान्यच केला जातो. दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

राम पूर्णेकरांनी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांना भेटीची विनंती 

तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना वेळ आणि भेट द्यावी अशी, भावनिक पोस्ट राम पूर्णेकर यांनी करत भेटण्याची विनंती केली आहे. मुख्य आरोपी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करून फाशीच्या शिक्षा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे. पूर्णेकर कुटुंबीयाबाबत शिंदे गट राजकारण करत आहे, खासदार नरेश मस्के यांनी देखील राजकारण करू नये, अशी विनंती राम पूर्णेकरांनी केली आहे.

Follow Us
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली