AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : कल्याणमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीस अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 10:59 PM
Share

Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE : कल्याणमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीस अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला असून घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Gas) तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसू शकतो. दोन लाखांच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज; “सातबारा कोरा करा”ची जोरदार मागणी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकरी नाराज आहेत. रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असेल. महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमधून जाणून घेण्यात येतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Mar 2026 09:55 PM (IST)

    जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, 8 गावठी पिस्तुलांसह 10 काडतूस जप्त

    जळगावात पोलिसांची मोठी कारवाई

    8 गावठी पिस्तुलांसह 10 काडतूस जप्त

    जळगावातील जिल्हापेठ पोलिसांकडून 7 आरोपींना अटक

    घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती

  • 07 Mar 2026 05:50 PM (IST)

    ज्योती वाघमारे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

    ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

    शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे सोलापुरात दाखल

    ज्योति वाघमारे यांचं सोलापुरात जंगी स्वागत

    ज्योती वाघमारे यांचं शहरात भव्य स्वागत

  • 07 Mar 2026 05:30 PM (IST)

    कल्याणमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

    कल्याणमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण

    मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

    कल्याणमधील बैलबाजार परिसरातील झंन्कार मोहल्यातील व्हिडीओ असल्याची माहिती समोर

    व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीला घेतलं आहे दत्तक

    शेजारच्या महिलेला चिमुकलीने मम्मा म्हटल्याने महिलेने केली मारहाण

  • 07 Mar 2026 05:20 PM (IST)

    बदलापूरमध्ये आईवर जीवघेणा हल्ला, आरोपी मुलाला अटक

    बदलापूरमध्ये आईवर जीवघेणा हल्ला

    हल्लेखोर  फरार मुलाला गुन्हे शाखेकडून अटक

    मोबाईल मधील रेकॉर्डिंग डिलीट केलं म्हणून केली होती मारहाण

    घटनेमुळे मोठी खळबळ

  • 07 Mar 2026 04:53 PM (IST)

    कल्याणमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीस अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

    कल्याणमध्ये एका तीन वर्षाच्या चिमुकलीस अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कल्याणमधील बैलबाजार परिसरातील  झंकार मोहल्ल्याचा हा व्हिडिओ असल्याची माहिती पुढे आली आहे. या चिमुरडीला दत्तक घेतले असून शेजारच्या महिलेला चिमुकलीने मम्मा म्हटल्याने ही महिला मारहाण करीत आहे असे उघड झाले आहे.

  • 07 Mar 2026 04:40 PM (IST)

    126 माओवाद्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासमोर केले आत्मसमर्पण

    तेलंगाना राज्यातील हैदराबाद येथे 126 माओवाद्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.  हे सर्व माओवादी गडचिरोली सीमारती भागतील तेलंगाना आणि छत्तीसगड राज्यात सक्रिय होते.  गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला तेलंगाना राज्यातील भाग करीमनगर, वरंगल, आदिलाबाद या तीन जिल्ह्यात या 126 माओवाद्यांवर सर्वात जास्त गुन्हे  दाखल आहेत

  • 07 Mar 2026 04:33 PM (IST)

    डोंबिवलीत कार पेटवून देणारी ‘टोळी’ सक्रिय

    डोंबिवलीत कार पेटवून देणारी ‘टोळी’ सक्रिय असून  सीसीटीव्ही फुटेजमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दोन तरुण, एका स्कुटीवरून आले आणि स्फोटक टाकून त्यांनी १० लाखांची कार भस्मसात केली. सीसीटीव्हीमध्ये डोंबिवलीतील ही घटना कैद झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 07 Mar 2026 04:19 PM (IST)

    भाजपा नगरसेवकांच्या मार्गदर्शन अभ्यास वर्गाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

    पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026  दादर येथील वसंत स्मृती येथे आज आणि उद्या असे दोन दिवस पार पडणार आहे. या अभ्यास वर्गाचे उदघाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते झाले.  या अभ्यास वर्गात एकूण नऊ सत्रे होणार असून विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. सभागृहातील कामकाज आणि विविध विषय कसे मांडायचे याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यास वर्गाचा समारोप उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे

  • 07 Mar 2026 03:54 PM (IST)

    नाशिक- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील विंचूर येथे वाहतूक कोंडी

    नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकारणाचे काम सुरू असल्याने एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूकीमुळे गेल्या तीन चार तासांपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

  • 07 Mar 2026 03:41 PM (IST)

    ठाणे : टिटवाळा-गोवेली रोडवर ट्रॅव्हल्स गाडीत रक्ताचे डाग, चालक बेपत्ता

    कल्याण टिटवाळा–गोवेली रस्त्यावर उभ्या ट्रॅव्हल्स गाडीत रक्ताचे डाग आढळल्याने खळबळ उडाली आहे. गाडीचा चालक नशीर अन्सारी बेपत्ता आहे, पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. चालकासोबत अनुचित प्रकार घडला की त्यानेच काही कृत्य केले? याबाबत तपास सुरू आहे.

  • 07 Mar 2026 03:28 PM (IST)

    सांगली महापालिकेच्या शाळांचे विरोधी पक्ष नेत्यांकडून झाडाझडती

    सांगली महापालिका क्षेत्रातल्या महापालिका शाळांचे काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून घेण्यात आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सांगलीतल्या महापालिका शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारया पोषण आहाराच्या दर्जाची देखील पाहणी केली.

  • 07 Mar 2026 03:15 PM (IST)

    ठाणे : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

    ठाण्यात घरगुती गॅस सिलिंडर दर वाढी विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून गॅस दर वाढीचा निषेध करण्यात आला. महिला दिनाची अनोखी भेट, गॅस सिलिंडर जातोय हजारावर थेट अशा आशयाचे पोस्टर यावेळी महिलांच्या हातात पहायला मिळाले.

  • 07 Mar 2026 02:55 PM (IST)

    टिटवाळा-गोवेली रोडवर ट्रॅव्हल्स गाडीत रक्ताचे डाग

    कल्याण टिटवाळा–गोवेली रस्त्यावर उभ्या ट्रॅव्हल्स गाडीत रक्ताचे डाग आढळल्याने खळबळ माजली आहे. गाडीचा चालक नशीर अन्सारी बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

  • 07 Mar 2026 02:40 PM (IST)

    अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड

    अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी 2 वाजून11 मिनिटांची लोकल बदलापूर स्थानकातच रखडली.

  • 07 Mar 2026 02:25 PM (IST)

    राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे सोलापुरात

    राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे सोलापुरात पोहोचल्या आहेत. लहानपणातील गरिबीच्या आठवणी सांगताना ज्योती वाघमारे यांना अश्रू अनावर झाले आहे. संजय राऊंतांच्या शुभेच्छांनंतर राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंचे विनम्र उत्तर देखील दिले. संजय राऊतांनी शुभेच्छा मला देण्याऐवजी एकनाथ शिंदे यांना द्या असे म्हटले आहे.

  • 07 Mar 2026 02:10 PM (IST)

    कल्याणमध्ये ‘फिल्मी स्टाईल’ कारवाई, पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या

    कल्याण जवळील आंबिवली येथील कुप्रसिद्ध इराणी वस्तीत पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्यात आहे. ठाण्याच्या चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या मोहम्मद अजीज इराणी याला पकडण्यासाठी खडकपाडा आणि चितळसर पोलिसांनी संयुक्त सापळा रचला होता. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा आणि पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेचा संपूर्ण थरार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • 07 Mar 2026 02:01 PM (IST)

    रत्नागिरीच्या लोटे MIDCमधील डॉक्टर खान कंपनीत स्फोट

    रत्नागिरीच्या लोटे MIDCमधील डॉक्टर खान कंपनीत स्फोट. 11 कामगार जखमी, 5 जणांवर चिपळूणमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. 3 गंभीर जखमींवर मुंबईतील ऐरोलीत उपचार सुरु. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेले नसून याबाबत तपास सुरू आहे.

  • 07 Mar 2026 01:45 PM (IST)

    नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल

    नाशिकच्या इगतपुरीतील समाज कल्याण विभागाच्या होस्टेलमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी 5 जणांवर कलम 21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.. होस्टेलच्या अध्यक्षांसह चार जणांवर गुन्हा दाखल झालाय… पाचही जणांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आलीये… दहावीच्या विधी संघर्षित बालकांवर रॅगिंगच्या माध्यमातून अनैसर्गिक कृत्य… पालकांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झालाय… दरम्यान, वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यावर गुन्हाबाबत आणखी उलगडा होणार..

  • 07 Mar 2026 01:30 PM (IST)

    नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या हलगर्जीपणावर NSUI आक्रमक

    नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या हलगर्जीपणावर NSUI आक्रमक झालीये.. विद्यापीठाच्या कुलगुरु डॉक्टर मनाली क्षीरसागर कठपुतली असल्याचा आरोप करत NSUI ने आंदोलन केलंय…. कुलगुरूंच्या दालनाबाहेर नावाच्या पाटीवर खेळण्यातील कठपुतली लावत संताप व्यक्त केलाय…. 45 दिवस उलटूनही 500 पेक्षा जास्त विषयांचे निकाल प्रलंबित असल्याने NSUI आक्रमक झालीये… परीक्षा घेणारी कंपनी कोएम्प्ट एजु टेक प्रायव्हेट लिमिटेड वर कारवाईची मागणी असतांना कारवाई होत नसल्याचा आरोप NSUI ने केलाय..

  • 07 Mar 2026 01:20 PM (IST)

    कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

    कर्जमाफी मिळाली म्हणजे न्याय मिळाला. अजितदादा असते तर त्यांनी अर्थसंकल्प सादर केला असता. ’27 तारखेपर्यंत अजितदादा अर्थसंकल्पाची तयारी करत होते- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

  • 07 Mar 2026 01:10 PM (IST)

    इराणचा बहरीनच्या सरकारी तेल रिफायनरीवर हल्ला

    इराणनं बहरीनच्या सरकारी तेल रिफायनरीवर हल्ला केलाय..मिसाईल डागल्यानं रिफायनरीच्या एका युनिटचं नुकसान झालंय..इराणच्या हल्ल्यानंतर बहरीनमधील ऑईलचं नुकसान

  • 07 Mar 2026 01:00 PM (IST)

    अर्थसंकल्पात सगळ्या घटकांना दिलासा

    संपूर्ण अर्थ संकल्प जो आहे सगळ्या घटकांना स्पर्श करणारा आहे. 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी झाली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मध्ये 23 हजार किलोमीटर चे रस्ते होणार आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष होणार आहेत. त्यानिमित्ताने देखील मोठ्या प्रमाणात काम होणार आहेत. सामाजिक समता म्हणून हे वर्ष साजरे केले जाणार आहे असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

  • 07 Mar 2026 12:50 PM (IST)

    शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

    धुळे जिल्ह्यातील चोर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. शिंदखेडा तालुक्यात विक्रांत येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकर्‍यांकडून जमीन देण्यात आली होती. जमीन घेऊन देखील शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष आणि दिशाभूल केल्याने सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन केले.

  • 07 Mar 2026 12:40 PM (IST)

    शेतकरी मदतीवरून पाशा पटेल भडकले

    युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी,कांदे इतर पडून आहेत यावर शेतकऱ्यांना मदत मिळणार का या प्रश्नावर एक पाशा पटेल भडकले.पाशा पटेल शेतकरी प्रश्नावर भडकले. मी पन्नास वर्ष शेतकऱ्यांसाठी काम केलेल्या माणसाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारत आहात.विषय अवघड आहे जरा समजून घ्या असे ते म्हणाले.

  • 07 Mar 2026 12:30 PM (IST)

    प्लास्टिकला बांबूचा पर्याय -पाशाभाई पटेल

    बांबू पदर्शन मांडले आहे याचा जगभरातील कलाकार सोबत तुलना केली तर आपण मागे आहोत, बांबू हे प्लास्टिकला पर्याय असू शकतो, बांबू न तोडला तर मरतो. माझा चष्मा घड्याळ बांबूचे आहे,या सगळ्या गोष्टी बांबू पासून बनणार असतील तर हा नवीन चमत्कार आहे. आपल्या सगळ्यांचा अस्तित्व समरूपाच्या दिशेने सुरुवात झाली आहे असे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल म्हणाले.

    फॉसिल फ्युएल बंद करावा लागणार आहे आणि बायो फ्युएल करावा लागणार आहे, लाकडाच्या बाबतीत अग्रेसर व्हायचं म्हणले तर वीस तीस वर्षे लागतील.. मानव जात वाचवण्यासाठी हे आहे.मी बांबू समर्थक आहे.काल महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये 4 हजार 300 कोटी बांबू साठी देण्यात आले आहेत, इन्व्हेस्ट वाढवणार आहे. शेतकऱ्याला अनुदानही सरकार देणार आहे, असे पटेल म्हणाले.

  • 07 Mar 2026 12:21 PM (IST)

    बाळ विक्री प्रकरणातील आरोपी डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

    गोंदिया येथील डॉ. नितेश वाजपेयी यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी नवजात बाळ भंडारा येथील पांढराबोडी येथे अडीच लाखात विक्री केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टर सह 6 आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात अधिक तपास केला असताना आणखी एक बाळ डॉक्टरने विक्री केला असल्याचं उघड झालं. त्या बाळाची आई ही अल्पवयीन मुलगी होती. पीडित मुलगी छत्तीसगड राज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया येथे आली होती.

  • 07 Mar 2026 12:10 PM (IST)

    लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक घटली

    लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक घटली. कांदा आवक घटल्याने कांद्याचे बाजारभाव अंशतः स्थिरावले. आज 685 वाहनांतून कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीतजास्त 1300 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. तर 400 ते 700 रुपये दराने कांदा खरेदी सुरू आहे.

  • 07 Mar 2026 12:00 PM (IST)

    युद्धाचा परिणाम आता पेट्रोल डिझेल डीलरवर?

    ॲडव्हान्स पैसे भरा नंतरच पेट्रोल मिळेल असा मॅसेज तेल कंपन्यांनी पुण्यातील पेट्रोल डिझेल डीलरला आले आहेत. कालपासून पुण्यातील अनेक डीलर्सला पेट्रोल कंपन्यांचे मेसेज आले आहेत. युद्ध पेटल्यामुळे येणाऱ्या तेलावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे रोज पेट्रोल डिझेल हवा असेल तर ॲडव्हान्स पैसे भरा असं डीलर ला त्या त्या कंपनीने मेसेज करून सांगितले आहे. अगोदर आठ-आठ दिवसाचं क्रेडिट पेट्रोल डीलरला मिळत होते मात्र आत्ता असं मिळणार नाही असं कंपन्यांकडून सांगण्यात आला आहे.

  • 07 Mar 2026 11:57 AM (IST)

    मधमाश्या काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहरित पडून मृत्यू..

    वाशिम तालुक्यातील काटा ते वाशिम रस्त्यावर असलेल्या दागडिया यांच्या शेतातील विहिरीवर मधमाश्यां काढण्यासाठी गेलेल्या कोंडाळा येथील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोंडाळा गावातील ३६ वर्षीय भानुदास शिंदे हे मधमाश्यांचे महुळ काढण्यासाठी विहिरीवर गेले असता अचानक माश्यांनी डंख मारल्याने ,ते घाबरून विहिरीत पडले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे….

  • 07 Mar 2026 11:47 AM (IST)

    केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील शेतकऱ्याने खिल्लारी गाईचे घातले डोहाळे जेवण

    केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील शेतकरी अनिल राख यांनी आपल्या पिल्लू नावाच्या खिल्लारी गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी महिलांनी गाईची ओटी भरली, या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी शेकडोच्या संख्येने गावकरी उपस्थित होते. गौमातेच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने संपूर्ण गावाला गोड जेवण केले होते. याचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

  • 07 Mar 2026 11:35 AM (IST)

    मुंबईतील वर्सोवा येथील एका १० मजली इमारतीचा वरचा मजला पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल

    मुंबईच्या वर्सोवा सात बंगला परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी सात बंगला परिसरात १० मजली इमारत रीडेव्हलपमेंटमध्ये गेली होती, या इमारतीचं डेमोलेशन कुठल्याही नियमांचा पालन न करता सुरू होती.  आता इमारतीचा मोठा भाग खाली कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ १० दिवसांपूर्वीचा आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून मात्र या इमारतीचा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इमारत आहे त्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  कुठलेहीे नियम न पाळून सुरक्षा व्यवस्था न करता डेमोलेशन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.

  • 07 Mar 2026 11:25 AM (IST)

    पेट्रोल पंप कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून आगाऊ पैसे घ्यायला केली सुरुवात

    नाशिक येथे  पेट्रोल पंप कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून आगाऊ पैसे घ्यायला सुरुवात केली. यापूर्वी दोन दिवसांचे क्रेडिट दिले जायचे मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आगाऊ पैसे घ्यायला कंपन्यांनी सुरुवात केली. भारताकडे पुरेसा पेट्रोल डिझेल स्टॉक शिल्लक मात्र युद्ध किती दिवस चालणार याबाबत शासंकता आहे.  त्यामुळेच आता कंपन्यांकडून आगाऊ पेमेंट घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे.  पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यास सर्वसामान्यांना थेट बसणार युद्धाची झळ…

  • 07 Mar 2026 11:13 AM (IST)

    शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा सत्कार

    शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला आहे. सोलापुरातील मोदी परिसरातील मूळ झोपडपट्टीतील घरी जात वाघमारेनी घेतली आप्तेंष्टांची भेट घेतली. परिसरातील महिलांकडून ज्योती वाघमारे यांना ओवाळणी करत त्यांचे स्वागत केले जात आहे.

  • 07 Mar 2026 10:50 AM (IST)

    चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, थेट मध्यरात्रीच..

    धाराशिवच्या वाशीमध्ये मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. वाशी शहरातील कळंब रस्ता येथील चौकात मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराज यांचा सुमारे सहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवला. या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल,घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता

  • 07 Mar 2026 10:40 AM (IST)

    केडीएमसीच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; एक्स्पायर्ड मशीनवर रुग्णांची परीक्षा

    2025 डिसेंबर मध्येच रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या एक्स-रे मशीनवरच दररोज 150 ते 200 रुग्णांचा एक्स-रे. रजिस्ट्रेशन रेडिएशन सर्टिफिकेट नसल्याने एक्स-रे च्या वेळी अधिक रेडिएशन होत असल्याने रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता. केडीएमसीचा भोंगळ कारभार मुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ? … संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळे याची तक्रार देत मागणी

  • 07 Mar 2026 10:30 AM (IST)

    जीएसटीच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह खाजगी व्यक्तीला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडले

    नाशिकमध्ये जीएसटीच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह खाजगी व्यक्तीला 20 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. नाशिकमध्ये मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. एका व्यावसायिकाविरोधातील कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात या जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांनी मागितली होती 1 कोटी 25 लाखांची मागणी. तडजोडी अंती एक कोटीची रक्कम निश्चित करून घेतला 20 लाखांचा पहिला हप्ता

  • 07 Mar 2026 10:21 AM (IST)

    इराणचा साैदी अरेबियामध्ये अत्यंत मोठा हल्ला, थेट..

    इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर हल्ला केला आहे, जिथे अमेरिकन सैन्य तैनात आहे. या हल्ल्यात तळावर काम करणारे अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

  • 07 Mar 2026 10:20 AM (IST)

    मलकापूर शहरातील तणावाची परिस्थिती निवळली

    बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर शहरातील अब्दुल हमीद चौकात लहान मुलांच्या वादांमुळे दोन गट आमने सामने आले होते.. याचा रूपांतर दगडफेकीत झाल्यावर तणावावी परिस्थिती निर्माण खाली होती .. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात तणावाची परिस्थिती निवळली असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 07 Mar 2026 10:18 AM (IST)

    उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली होती- संजय राऊत

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी त्यांनी कर्जमाफी केली होती, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

  • 07 Mar 2026 10:05 AM (IST)

    शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून हटके जल्लोष

    मुलीची सभापतीपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून हटके जल्लोष.  बापलेकीचा डीजेच्या तालावरचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा भन्नाट डान्स. शिवसेना भाजपामध्ये सभापती पदावरून होती रस्सीखेच, महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला सभापतीपद

  • 07 Mar 2026 09:48 AM (IST)

    कल्याणमध्ये कुख्यात पीडी भाईंची दहशत; रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

    कल्याणमध्ये कुख्यात पीडी भाईंची दहशत; रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. “तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो! असे सांगत रेल्वे कंत्राटदारला भर चौकात 5–6 साथीदार सोबत बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत कंत्राटदार विशाल नायडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्या  डोक्याला 9 टाके पडले. रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

  • 07 Mar 2026 09:32 AM (IST)

    नाशिक – युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार ?

    नाशिक-  युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपावर सध्या धास्तीचे वातावरण असून अनेक पंप चालकांना कंपन्यांकडून आगाऊ रक्कम देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी शक्यता आहे.   सध्या पेट्रोल 104.77 रुपये प्रति लीटर तर डिझेल 91.28 रुपये प्रति लिटर आहे.

  • 07 Mar 2026 09:23 AM (IST)

    परभणी- सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एसीबीच्या सापळ्यात

    परभणी- सोनपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एसीबीच्या सापळ्यात अडकला.  बिट जमादार भगवान मुंडेला 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक करण्यात आली. निळा फाटा येथील रसवंती गृहात बेड्या ठोकण्यात आल्य.  गोशाळेतील मुलीने केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी मुंडे यांनी 10 हजारांची लाच मागितली होती.

  • 07 Mar 2026 09:05 AM (IST)

    नाशिक – वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांवर परिणाम….

    लासलगाव  – वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांवर परिणाम होताना दिसत आहे.  द्राक्षांची प्रतवारी टिकवण्यासाठी सफेद कापडाचे अच्छादन टाकण्याचा प्रयोग लासलगाव परिसरात शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र द्राक्ष बागांवर कापड टाकण्यासाठी एकरी 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च येत आहे.  वाढत्या खर्चामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत.

  • 07 Mar 2026 09:04 AM (IST)

    इराण-अमेरिका युद्धाच्या झळा भारतापर्यंत, गॅस सिलिंडर्चाय दरात 60 रुपयांची वाढ

    इराण-अमेरिका युद्धाच्या झळा भारतापर्यत पोहोचल्या असून त्याचे चटके भारतातील नागरिकांना बसणार आहेत.  घरगुती सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली असून नवे दर आजपासू लागू केले जाणार आहेत. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Published On - Mar 07,2026 9:01 AM

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...