AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News: कबुतरांना दाणे टाकणाऱ्या व्यापाऱ्याला कोर्टाचा दणका! देशातील पहिली शिक्षा, इतक्या हजारांचा दंड

Feeding Pigeons in Mumbai-Dadar: कबुतरांना दाणे टाकल्याप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. दादर येथील कबुतरखाना बंद करण्यात आल्यानंतरही काही व्यापारी कबुतरांना दाणे टाकत होते. त्यातील एका व्यापाऱ्याला कोर्टाने आता मोठा दणका दिला आहे. देशातील ही पहिली शिक्षा मानली जात आहे. काय आहे अपडेट?

Mumbai News: कबुतरांना दाणे टाकणाऱ्या व्यापाऱ्याला कोर्टाचा दणका! देशातील पहिली शिक्षा, इतक्या हजारांचा दंड
कबुतरांना दाणे टाकल्याप्रकरणात पहिल्यांदा दंडाची शिक्षा
| Updated on: Dec 27, 2025 | 10:15 AM
Share

Court Fine on Businessman BMC Rules about Feeding Pigeons: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. दादर येथील कबुतरखान्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे काही जण नाराज झाले. त्यावरून अनेक जण रस्त्यावर उतरले. पण मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतरही काही जण दादर येथे येऊन दाणे टाकत होते. दादर परिसरात राहणारे व्यापारी नितीन शेठ यांना याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्यांना दंड ठोठावला. अशाप्रकारची ही देशातील पहिली शिक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

व्यापाऱ्याने चूक केली कबूल

नितीन शेठ हे दादर परिसरात राहतात. ते व्यापारी आहेत. दादर परिसरातील कबुतरखाना बंद करण्यात आल्यावर, त्यांनी येथे येत कबुतरांना दाणे टाकले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. नितीन यांनी चूक कबूल केली. पोलिसांनी सांगितले की हा व्यापारी सार्वजनिक ठिकाणी बंदी घातलेली असतानाही कबुतरांना दाणा टाकत होता. तक्रारी आधारे या व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली.

5 हजार रुपयांचा दंड

याप्रकरणी कोर्टाने व्यापाऱ्याला 5,000 रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी सोमवारी हा निकाल दिला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 (ब) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. व्यापाऱ्याने लोकांचे आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका पोहचवल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय बीएनएसचे कलम 271 अंतर्गत आरोग्याला घातक आजार पसरवल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला.

या निकालपत्रात कोर्टाने हे स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची शिक्षा पहिल्यांदाच देण्यात येत आहे. हे एक उदाहरण आहे. त्यामुळे लोकांनी भविष्यात असे कृत्य करु नये असे मत न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले. बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) यापूर्वीच कबुतरांना दाणे टाकण्यावर प्रतिबंध घातला आहे. ऑगस्ट महिन्यात याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी झाली होती. हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रतिबंध कायम ठेवला आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?