Prashant Jagtap : आता मरेपर्यंत काँग्रेसमध्ये… राष्ट्रवादीच्या आघाडीला विरोध करत प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, ‘पंजा’ हाती घेतला
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य आघाडीला विरोध करत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑफर नाकारून, त्यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेवर रुपाली ठोंबरे यांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील संभाव्य आघाडीला जगताप यांनी तीव्र विरोध केला होता. ही आघाडी कार्यकर्त्यांच्या विचारधारेविरुद्ध असल्याचे त्यांचे मत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना जगताप यांनी सांगितले की, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साडेसव्वीस वर्षे होते आणि त्यांनी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. आता काँग्रेसमध्ये आल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबतच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही पक्षात येण्याची ऑफर दिली होती, मात्र विचारधारेनुसार काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

