अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
नांदेड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. जे येथील त्यांच्यासोबत जाऊ अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.
महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव दिलेला होता. शिवसेनेने सकारात्मकता दाखवली. या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंत पाटील आणि माझी बैठकही झाली. मला वाटते याच्यात आज उद्यापर्यंत यात आम्ही निश्चित पुढे जाऊ असे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. जे सोबत येतील त्यांचे स्वागत आहे. सोबत जर नाही आले तर स्वतंत्रपणे राष्ट्रवादी लढेल. भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा विषय संपलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हं आहेत. परवाही आमच्या बैठकीत पक्षश्रेष्टींनी सूचना दिलेली आहे. स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम असतील. सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झालेली असल्याचेही त्यांनी म्हटलेले आहे. काँग्रेसचे १० नगरसेवक एमआयएममध्ये दाखल झाले आहेत, या मागे अशोक चव्हाण यांची खेळी आहे असे म्हटले जात आहे याविषयी विचारले असता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एमआयएम कोणाच्या इशाऱ्यावर काम करते हे सर्वांना माहिती आहे,चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचा आहे असा आरोपही चिखलीकर यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप

