Bangladesh Eurofighter Typhoon : बांग्लादेशचा घातक युरोफायटर टायफून खरेदीचा प्लान, पण भारताला अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण…
Bangladesh Eurofighter Typhoon : बांग्लादेशात अजून निवडणुका झालेल्या नाहीत. तिथे पाच वर्षांसाठी सरकार निवडून आलेलं नाही. मात्र सध्याच्या अंतरिम सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांना युरोपियन देशांकडून युरोफायटर टायफून हे घातक फायटर जेट खरेदी करायचं आहे. त्यामुळे भारताने चिंता करण्याची गरज आहे का? भारताकडे हे विमान पाडण्याची क्षमता आहे का?

बांग्लादेशात मागच्यावर्षी मोठं जनआंदोलन झालं. त्यातून शेख हसीना यांना सत्तेवरुन पायउतार व्हाव लागलं. तेव्हापासून बांग्लादेशची पावलं सातत्याने भारताविरोधात पडत आहेत. बांग्लादेशचे सध्याचे सत्ताधारी पाकिस्तानच्या नादाला लागले आहेत. त्यातून अनेक भारताच्या हिताला दुखावणारे निर्णय घेण्यात आले. आता बांग्लादेशला आपल्या एअरफोर्सचं आधुनिकीकरण करायचं आहे. यासाठी बांग्लादेश चांगल्या फायटर जेट्सच्या शोधात आहे. बांग्लादेश आधी चीनची J-10C फायटर विमानं खरेदी करण्यात इंटरेस्टेड आहे अशा बातम्या आल्या होत्या. पण बांग्लादेशने आता आपला मोर्चा युरोफायटर टायफूनकडे वळवला आहे. युरोफायटर टायफून हे 4.5 जनरेशनचं घातक फायटर विमान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या राफेलचा मुख्य स्पर्धक म्हणून युरोफायटर टायफूनकडे पाहिलं जातं. युरोपातील काही देशांनी एकत्र येऊन या फायटर जेटची निर्मिती केली आहे.
बांग्लादेशने आता युरोफायटर टायफूनच्या खरेदीत रस दाखवला आहे. ही विमानं खरेदी करण्याची आपली इच्छा आहे. त्यासाठी चर्चा सुरु करावी अशा मजकूराचं पत्र त्यांनी इटलीला पाठवलं आहे. भारताने काही वर्षांपूर्वी फ्रान्सकडून राफेल फायटर विमानं विकत घेतली, त्यावेळी भारताला युरोफायटर टायफूनची सुद्धा ऑफर होती. पण भारताने राफेलची निवड केली. पत्र पाठवून चर्चा सुरु करणं ही पहिली स्टेप आहे बांग्लादेशी आर्मीच्या अधिकाऱ्याने रॉयटरला सांगितलं. किती विमानं विकत घ्यायची आहेत, ते बांग्लादेशी एअरफोर्सने अजून स्पष्ट केलेलं नाही.
त्यांच्याकडून उचलण्यात आलेलं हे मोठ पाऊल
बांग्लादेशात सध्या मुहम्मद युनूस यांचं अंतरिम म्हणजे तात्पुरत सरकार आहे. त्यांच्याकडून उचलण्यात आलेलं हे मोठ पाऊल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रस्तावित 35 टक्के टॅरिफ टाळण्यासाठी बांग्लादेशने जुलै महिन्यात बोईंगकडून 25 विमाने खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केलेला. युरोफायटर टायफूनचा करार प्रत्यक्षात आला, तर पाश्चिमात्य देशाच्या बनावटीचं हे पहिलं विमान बांग्लादेशकडे असेल.
युरोफायटर टायफूनची खासियत काय?
युरोफायटर टायफून हे एक हलकं लढाऊ विमान आहे. ब्रिटन, इटलाी आणि जर्मनी या तीन देशांनी मिळून हे विमान विकसित केलं आहे. एअरबस डाटानुसार, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत कंपनीने अशी 761 विमानं बनवली आहेत. युरोफायटर टायफून हे एक अत्याधुनिक, प्रगत फायटर जेट आहे. एकाचवेळी वेगवेगळ्या भूमिका पार पाडण्याची या विमानाची क्षमता आहे. LCD स्क्रीन, हेल्मेट माऊंटेड डिसप्ले आणि व्हॉइस इनपुट या विमानात आहे. AESA रडार या विमानात आहे. इन्फ्रा रेड सर्च आणि ट्रॅकिंग सिस्टिम. अत्याधुनिक सेन्सर, डाटा फ्यूजन, शक्तीशाली इंजिन्, विमान ऑपरेशन्सचा कमी खर्च ही या विमानाची वैशिष्ट्य आहेत. युरोफायटर टायफून हे मल्टीरोल फायटर विमान आहे. म्हणजे एकाच मिशनमध्ये हे विमान हवेतून जमिनीवरील आणि हवेतून हवेतील टार्गेटचा वेध घेऊ शकतं.
राफेलला आशियाचं बादशाह का म्हटलं जातं?
भारताकडे आजच्या घडीला अनेक खतरनाक फायटर जेट्स आहेत. त्यात राफेल आशियातील सर्वात खतरकनाक फायटर विमान आहे. या विमानात अशा अनेक खास गोष्टी आहेत, ज्यामुळे या विमानाला आशियातील किंग म्हटलं जातं. राफेलला आशियाचं बादशाह का म्हटलं जातं? जाणून घ्या.
सर्वात मोठी ताकद काय?
राफेल फायटर जेटची सर्वात मोठी ताकद आहे MBDA मीटियोर मिसाइल. मीटियोर मिसाइल एक हवेतून हवेत Beyond Visual Range म्हणजे नजरेपलीकडच्या लक्ष्याचा भेद करणारं क्षेपणास्त्र आहे. या मिसाइलमध्ये रॅमजेट इंजिन आहे. त्यामुळे उड्डाणादरम्यान ही मिसाइल आपल्या स्पीडवर नियंत्रण ठेऊ शकते. ही मिसाइल मॅक 4 स्पीडने टार्गेटचा वेध घेते. 100 किमीपेक्षा जास्त रेंजमधील टार्गेट या मिसाइलच्या नजरेतून सुटू शकत नाही.
8 टार्गेटवर हल्ला करु शकतं
राफेल फायटर जेटमध्ये RBE2 AA AESA रडार आहे. हे रडार इतकं घातक आहे की शत्रूला पहिलं हेरणं आणि पहिला हल्ला करण्यास सक्षम आहे. हे रडार मॅकेनिकल रडारप्रमाणे न फिरता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बीम मोडण्यास सक्षम आहे. काही सेकंदात हे विमानं आपली दिशा बदलू शकतं. हे रडार एकाचवेळी 40 टार्गेट्सना ट्रॅक करतं. 8 टार्गेटवर हल्ला करु शकतं. मोठ्या प्रमाणात जॅमिंग केल्यानंतरही हे रडार शत्रुला पाहण्यास सक्षम आहे.
वॉरफेयर सिस्टिम SPECTRA
राफेलकडे जगातील सर्वात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टिम SPECTRA आहे. ही सिस्टम काउंटरमेजर एक्टिव 360 डिग्रीमध्ये येणारे सर्व धोके ओळखते. शत्रुचे रडार सिग्नल जॅम करण्याची क्षमता आहे. ही सिस्टिम गरजेनुसार स्वत:च काउंटरमेजर एक्टिव करते. या जेटमध्ये SCALP क्रूज मिसाइल सुद्धा आहे. त्याची रेंज जवळपास 300 किलोमीटर आहे. वास्तविक याची रेंज 500 किमीपेक्षा जास्त मानली जाते.
भारताला का चिंता करण्याची गरज नाही?
भारताकडे S-400 ही लॉन्ग रेंज जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणारी मिसाइल सिस्टिम आहे. ही आजच्या तारखेला जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सगळ्या जगाने S-400 एअर डिफेन्स सिस्टिमची क्षमता पाहिली. एस-400 सिस्टिम एकाचवेळी 160 टार्गेटस हेरुन 72 लक्ष्यांचा एकाचवेळी वेध घेऊ शकते. S-400 मधील अँटी-बॅलेस्टिक मिसाइल सिस्टिम आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करते. या मिसालइल सिस्टिमची रेंज 400 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर अंतरावरुनच ही सिस्टिम टार्गेट्चा अचूक वेध घेते. ड्रोन, स्टेल्थ फायटर, क्रूझ मिसाइल आणि बॅलेस्टिक मिसाइल पाडण्याची या सिस्टिमची क्षमता आहे. 30 किमी उंचावरील लक्ष्याला नष्ट करण्यास S-400 सक्षम आहे. S-400 मध्ये हवाई धोका 400 किलोमीटर अंतरावर असतानाच ओळखण्याची क्षमता आहे.
इंडियन एअर फोर्सच्या रेंजमधून सुटणार नाहीत
S-400 स्कावाड्रनमध्ये दोन बॅटरी असतात. प्रत्येक बॅटरीमध्ये सहा लॉन्चर्स असतात. यात कमांड अँड कंट्रोल युनिट, टेहळणी रडार आणि 128 मिसाइल्स असतात. भारताने 2018 साली रशिया बरोबर पाच S-400 स्क्वाड्रनच खरेदी करार केला होता. 35000 हजार कोटीची ही डील होती. यातली तीन स्क्वाड्रन मिळाली आहेत. दोघांची डिलिव्हरी अजून बाकी आहे. 2026 पर्यंत उर्वरित स्क्वाड्रन्स मिळतील. त्यामुळे बांग्लादेशने युरोफायटर टायफून घेतलं तरी ते इंडियन एअर फोर्सच्या रेंजमधून सुटणार नाहीत.
