AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli : एका क्षणात चार पोलिसांसह 16 जणांना उडवलं, मध्यरात्रीच्या थराराने अख्खं शहर हादरलं, जखमींसाठी थेट बाहेरून…

सांगलीत मद्यधुंद इनोव्हा चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत अनेक नागरिकांना व वाहनांना धडक दिली. या भीषण हिट अँड रन प्रकरणात १६ जण जखमी झाले, ज्यात चार वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे. घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमींची रुग्णालयात चौकशी केली. सखोल चौकशीचे आदेश देत गंभीर जखमींवर उपचारासाठी बाहेरील डॉक्टरांनाही बोलावण्याचे निर्देश दिले आहेत.

Sangli : एका क्षणात चार पोलिसांसह 16 जणांना उडवलं, मध्यरात्रीच्या थराराने अख्खं शहर हादरलं, जखमींसाठी थेट बाहेरून...
हिट अँड रन मुळे सांगली हादरलं
| Updated on: Feb 03, 2026 | 10:29 AM
Share

सांगली शहरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाने मोठी खळबळ माजली आहे. शहरातील गणपती पेठ पासून टिळक चौकापर्यंत एका मद्यधुंद इनोव्हा गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना जोरदा धडक दिली. यामध्ये 14 ते 15 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये 4 वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे. सांगलीतल्या या प्रकरणाने मोठी खळबळ माजली. जखमींर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. या घटनेची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी जखमी रुग्णांची थेट शासकीय रुग्णालयात जाऊन चौकशी करत माहिती घेतली. बाहेरून डॉक्टर आणून शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

नेमकं घडलं तरी काय ?

1 फेब्रुवारी रोजी, रविवारी रात्री सांगली शहरात हिट अँड रनची घटना घडली. मद्यधुंद चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत अनेक वाहनांना धडक दिली, तसेच रस्त्यावरील काही नागरिकांनाही चिरडलं. या अपघातात चार पोलिसांसह 16 जण जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मद्यधुंद चालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातातील जखमींवर सांगलीतील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील 8 जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित 8 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण माहिती घेतली. तसेच आज सकाळी जखमी रुग्णांची थेट शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भयानक अपघातामध्ये एका महिलेच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी वेळप्रसंगी बाहेरून डॉक्टर आणून तिच्यावर उपचार करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. सदर अपघातातील चालक हा बाहेरचे जिल्ह्यातील होता. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केल्यामुळे तोही जखमी झाला आहे. नागरिकांनी जसे आपल्या हक्क कळतात तसे आपली कर्तव्याची जाणीव सुद्धा ठेवली पाहिजे असे मला वाटते. या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग