रस्त्यांवर असणाऱ्या पांढऱ्या आणि पिवळ्या पट्टयांचा नेमकं अर्थ काय आहे? अवश्य घ्या जाणून
आजच्या लेखात आपण रस्त्यावर असलेल्या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घेणार आहोत. तर हे तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे.

जेव्हा आपण रस्त्याबाजूने चालतो किंवा गाडीतून जातो तेव्हा आपल्याला रस्त्यावर असणाऱ्या पांढऱ्या आणि पिवळ्या पट्टया नक्कीच पाहतोच. आता रस्त्यावर असलेल्या या पट्ट्यांचा वाहन चालवताना उपयोग काय होतो. त्या पट्ट्या त्यांच रंगाच्या का असतील? आणि त्या पट्ट्या कधी सरळ रेषेत तर कधी तुकड्यांमध्ये आपण पाहतो, तर तुम्ही विचार केला असणार की या पट्टया रस्त्याचे दोन भाग करण्यासाठी आहेत. तर तुम्ही अगदी बरोबर आहात. मात्र या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांच्या पट्टया रस्त्याचे दोन भाग करण्यापुरतेच नाही तर त्याचे इतरही अर्थ आहेत, जे जाणून तुम्ही आश्चर्यचक्कती व्हाल. चला तर मग आजच्या लेखात आपण या पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांच्या रेषेचा अर्थ काय आहे आणि त्यांच्यातील फरक काय आहे ते जाणून घेऊयात.
– पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा या रोड मार्किंगचा एक हिस्सा आहे, ज्याचा उद्देश चालकांना लेन शिस्त, रहदारीची दिशा, ओव्हरटेकिंगचे नियम आणि रस्त्यांबद्दल अचूक माहिती प्रदान करण्यासाठी आहे.
– रस्त्यावर असलेली सरळ पांढरी पट्टी म्हणजे तुम्ही ज्या लेनमध्ये आहात त्याच लेन मध्ये गाडी चालवावी. तुम्ही समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करू शकत नाही. तर या पांढऱ्या पट्ट्या शहरातील रस्ते, महामार्ग आणि उड्डाणपूल यांसारख्या रस्त्यांवर सामान्यतः पाहिल्या जातात.
– तुटलेली पांढरी व पिवळी पट्टी रस्त्याच्या मधोमध असल्यास समजून घ्या की गाडी चालवताना तुम्हाला आवश्यक असल्यास लेन बदलण्याची किंवा सुरक्षित ओव्हरटेकिंग करू शकता.
– रस्त्याच्या कडेला असलेल्या सरळ पांढऱ्या पट्टीला एज लाइन म्हणतात. या पट्टीचा अर्थ असा आहे की ती रस्ता कुठे संपतो हे दर्शवते.
– पिवळ्या पट्ट्या असलेल्या रेषा सहसा दोन लेन असलेल्या रस्त्यांवर आढळतात जिथे वाहने विरुद्ध दिशेने जातात. तर या पट्टीचा अर्थ असा होतो की पिवळ्या पट्टीच्या पलीकडे जाऊ नये आणि समोरासमोरील गाड्यांचा अपघात होऊ नये. एक ठळक पिवळी रेषा म्हणजे विरुद्ध लेनमध्ये जाऊ नये तर तुटलेली पिवळी रेषा दर्शवते की सावधगिरीने ओव्हरटेकिंग करू शकता. तेलंगणामध्ये अशा प्रकारच्या पट्ट्या आढळतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
