AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या लेकीचा गुन्हा काय? ॲसिड हल्ला झालेल्या चिमुरडीच्या आईचा आक्रोश, कडकडीत बंदची हाक

अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये ६ वीतील मुलीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला. या भ्याड कृत्याविरोधात वडगावपान ग्रामस्थांनी रास्ता रोको केला असून पीडित मुलीवर लोणी येथे उपचार सुरू आहेत.

माझ्या लेकीचा गुन्हा काय? ॲसिड हल्ला झालेल्या चिमुरडीच्या आईचा आक्रोश, कडकडीत बंदची हाक
Sangamner Girl attack
| Updated on: Mar 18, 2026 | 11:16 AM
Share

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. वडगावपान परिसरात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात नराधमाने भररस्त्यात ॲसिड फेकून हल्ला केला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी कडकडीत बंदची हाक दिली आहे. तसेच मुख्य चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडगावपान येथील शाळेत शिक्षण घेत आहे. तिचे घर शाळेपासून साधारण ४ ते ५ किलोमीटर अंतरावर एका वस्तीवर आहे. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या सायकलवरून घराकडे निघाली. यानंतर मुख्य रस्त्यापासून वस्तीकडे जाणाऱ्या अरुंद आणि काहीशा निर्जन रस्त्यावर एक अज्ञात दुचाकीस्वार तिच्याजवळ आला. त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले. ती काही सांगण्याच्या आतच त्या माथेफिरूने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यानंतर मग वेगाने दुचाकीवरून पोबारा केला.

चेहऱ्यावर ॲसिड पडताच मुलगी वेदनेने विव्हळू लागली. तिच्या आरडाओरड्यामुळे परिसरातील शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तिला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ॲसिडमुळे मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग सुमारे ७ ते १० टक्के भाजला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. आज तिच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा द्या

पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडिलांचे निधन झाल्यामुळे ही मुलगी आपल्या आई आणि भावासोबत मामा व आजी-आजोबांकडे राहत होती. तिची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करत आहे. आमची कोणाशीही दुश्मनी नसताना माझ्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का झाला?” असा टाहो मुलीच्या आईने फोडला. याप्रकरणी मुलीच्या आईने आणि मामाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

ॲसिड विक्री संदर्भात अधिक कडक कायद्याची आवश्यकता

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक (SP) सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा केली. अशा घटना रोखण्यासाठी केवळ शाळांच्या बाहेरच नव्हे, तर ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवरही दामिनी पथकाची गस्त वाढवणे गरजेचे आहे. तसेच ॲसिड विक्री संदर्भात अधिक कडक कायद्याची आवश्यकता आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या विविध पथके तपासासाठी रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित हालचालींच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आज झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. मात्र आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...