AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळा सुटली, सायकलवर घरी निघाली अन् अचानक… चिमुकलीवर ॲसिड हल्ला, महाराष्ट्र हादरला

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वडगाव पान येथे ६ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला. शाळा सुटल्यावर घरी जाताना ही घटना घडली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शाळा सुटली, सायकलवर घरी निघाली अन् अचानक... चिमुकलीवर ॲसिड हल्ला, महाराष्ट्र हादरला
school girl acid attack (फोटो प्रातिनिधिक)
| Updated on: Mar 18, 2026 | 7:31 AM
Share

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

संगमनेरमधील वडगाव पान या ठिकाणी शाळेत ही मुलगी शिक्षण घेत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळी भरतात. सकाळी ११:३० ते १२:४५ च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ही मुलगी सायकलवरून आपल्या घराच्या दिशेने निघाली होती. गावच्या रस्त्याने जात असताना एका अज्ञात युवकाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले. काही समजण्याच्या आतच त्या नराधमाने या चिमुकलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यानंतर त्याने तिथून पळ काढला.

या अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी वेदनेने विव्हळू लागली. तिने आरडाओरड केल्यावर आसपासचे नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी तिला प्रथम स्थानिक डॉक्टर जम्बुकर हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.

संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपीच्या शोधासाठी १० विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याच्या बाजूने ७ टक्के भाजला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असून ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.पीडित मुलीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे. वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलीची आई मोलमजुरी करून घर चालवते.

या घटनेवर राजकीय स्तरातूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमदार चित्रा वाघ यांनी हा प्रकार अत्यंत संतापजनक असून शासन कोणतीही तडजोड करणार नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल,” असे म्हटले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री विखे पाटील स्वतः लक्ष ठेवून आहेत, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याचे निर्देश दिले आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका त्यांनी मांडली आहे. या अमानुष हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय.
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?.
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय.