AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Symbol Hearing : शिंदेच्या नव्या वकिलाने घाम फोडला, ठाकरेंचा तो दावाच निकाली काढला, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटीवर सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी जोरदार युक्तिवाद करत ठाकरे गटाच्या अपात्रतेच्या मागणीला आव्हान दिले. विधानसभा मुदत संपल्याने आमदारांना अपात्र ठरवणे निष्फळ असल्याचा त्यांचा दावा आहे. मेहतांच्या युक्तिवादाने खळबळ उडवली असून, कोर्टाचा अंतिम निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Shivsena Symbol Hearing : शिंदेच्या नव्या वकिलाने घाम फोडला, ठाकरेंचा तो दावाच निकाली काढला, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 3:40 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला. ध्रुव मेहता यांचा या प्रकरणातील पहिलाच युक्तिवाद होता. पहिल्याच युक्तिवादात ध्रुव मेहता यांनी ठाकरे गटाचा एक महत्त्वाचा दावा खोडून काढला आहे. विधानसभा मुदत संपल्यामुळे आता आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी निष्फळ ठरते, असा युक्तिवादच मेहता यांनी केला आहे. मेहता यांच्या या युक्तिवादाने शिंदे गटाला चांगलाच घाम फुटण्याची शक्यता आहे. मात्र, मेहता यांचा हा युक्तिवाद कोर्टात किती टिकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद पार पडला. यावेळी ध्रुव मेहता यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. 21 जून 2022 रोजी आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणुन भूमिका कायम होती. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे गटाचा व्हीप वैध होता, असा दावा ध्रुव मेहता यांनी केला आहे.

विधानसभा अध्यक्षांना अधिकार

10 व्या अनुसूचीअंतर्गत अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. अध्यक्षांच्या निर्णयात त्रुटी असल्यास सामान्यतः प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणे हा योग्य मार्ग आहे. विधानसभा मुदत संपल्यामुळे आता आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी निष्फळ ठरते, असं सांगतानाच मेहता यांनी राजेंद्रसिंह राणा आणि सुभाष देसाई प्रकरणातील न्यायालयीन निकालांचा दाखला दिला.

किहोतो होलोहोन प्रकरणाचा दाखला

यावेळी ध्रुव मेहता यांनी राणा केसचा दाखला दिला. विधानसभा अध्यक्षांच्या बाबतचा निर्णय हा चिन्ह निर्णयाशी कनेक्टेड आहे. ते विधानसभा अध्यक्षांचे घटनात्मक अधिकार आहेत, असं सुभाष देसाई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. विधानसभा अध्यक्षांना केवळ विद्यमान सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेता येतो. किहोतो होलोहोन प्रकरणाच्या निवाड्यानुसार विधानसभा अध्यक्ष हे दहाव्या अनुसूचीअंतर्गत न्यायाधिकरण म्हणून काम करतात. त्यांच्या निर्णयाची न्यायालयीन समीक्षा मर्यादित निकषांवरच होऊ शकते, असा युक्तिवाद मेहता यांनी केला.

दिवाळीनंतर सुनावणी

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या चुकीचा ठरल्यास प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणे हा सामान्यतः योग्य आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आजची सुनावणी संपली असून आता या प्रकरणावर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे.

Follow Us
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...