ही 7 सीटर इलेक्ट्रिक कार 4.10 लाख रुपयांनी झाली स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, किंमत किती?
इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ही 7 सीटर इलेक्ट्रिक कार 4.10 लाख रुपयांनी झाली स्वस्त. घेण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी. किंमत किती?

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः 7 सीटर इलेक्ट्रिक कारला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. हीच संधी लक्षात घेऊन व्हिएतनामची वाहन उत्पादक कंपनी VinFast ने आपल्या VF MPV 7 या प्रीमियम इलेक्ट्रिक कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने या कारच्या किमतीत तब्बल 4.10 लाख रुपयांची घट केली आहे.
यापूर्वी VinFast VF MPV 7 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 24.49 लाख रुपये होती. मात्र, आता कंपनीने ती कमी करून 20.39 लाख रुपये केली आहे. म्हणजेच ग्राहकांना या कारवर थेट 4.10 लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे, किमतीत कपात केली असली तरी कारचे फीचर्स, बॅटरी क्षमता आणि ड्रायव्हिंग रेंजमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
लाँचनंतर अवघ्या सहा महिन्यांपेक्षा थोडा अधिक काळ झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रीमियम 7 सीटर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
एका चार्जमध्ये मिळणार 517 किमीची रेंज
VinFast VF MPV 7 मध्ये 60.13 kWh क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका पूर्ण चार्जमध्ये तब्बल 517 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
चार्जिंगसाठी यामध्ये 6.9 kW AC चार्जिंग आणि 80 kW पर्यंत DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ही इलेक्ट्रिक MPV उपयुक्त ठरू शकते.
पॉवरफुल मोटर आणि दमदार स्पीड
या इलेक्ट्रिक कारमध्ये फ्रंट माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 204 hp पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. कारचा टॉप स्पीड ताशी 140 किलोमीटर आहे. तसेच ही कार अवघ्या 9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.
VinFast VF MPV 7 ही सात आसनी इलेक्ट्रिक कार असल्याने मोठ्या कुटुंबासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. आकर्षक डिझाइन, प्रशस्त केबिन आणि आधुनिक फीचर्स ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विशेषतः लांबच्या प्रवासासाठी अधिक जागा आणि इलेक्ट्रिक वाहनाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना ही कार आकर्षित करू शकते.
