AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार यांना सर्वात मोठा झटका, अखेर चौकशी होणार, सरकारचे आदेश

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना जुन्या लाचखोरी प्रकरणी धक्का बसला आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर दोन दशकांपूर्वीच्या केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टमधील कथित 2 कोटी रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हिजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरो (VACB) या प्रकरणाची चौकशी करेल.

ज्ञानेश कुमार यांना सर्वात मोठा झटका, अखेर चौकशी होणार, सरकारचे आदेश
Gyanesh KumarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 3:12 PM
Share

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सर्वात मोठा झटका बसला आहे. लाचखोरीप्रकरणी ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दशकापूर्वीचं हे प्रकरण आहे. केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी संबंधित आहे. एक ठेकदार साजन याने त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्यावर दोन कोटी रुपये लाच मागितल्याचा आरोप केला होता. या तक्रारीच्या आधारे व्हिडिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरोला (VACB) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्ञानेश कुमार हे केरळमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव होते. तेव्हाचं हे प्रकरण आहे. तक्रारदार साजन हा कोल्लम जिल्ह्यातील चांदयामंगलम येथील रहिवाशी आहे. त्याने व्हिजिलन्स डिपार्टमेंटच्या संचालकांकडे तक्रार केली होती. राज्यातील रस्ते बांधल्यानंतरही कंपनीचे पैसे रखडवण्यात आले होते. अभियंत्यांनी 17 कोटींच्या बिलाला मंजुरी दिली होती. पण त्यानंतरही आमचा चेक देण्यात आला नव्हता, असं तक्रारीत म्हटलं आहे.

दोन कोटीची लाच मागितली

साजन याने त्याच्या तक्रारीत मलेशियाची कंपनी PATI-BEL आणि त्याच्या ठेकेदारांचा उल्लेख केला आहे. कंपनीचे प्रोजेक्ट इंजीनिअर मलेशियाई नागरिक ली सी बीन यांनीच मला ज्ञानेक कुमार हे कथितपणे दोन कोटी रुपयंची लाच मागत असल्याचं सांगितलं होतं, असं म्हटलं आहे. दोन कोटी दिल्याशिवाय चेक जारी केला जाणार नाही, असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं होतं. लाच देऊन चेक मिळवण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नव्हती. काही रक्कम देऊन प्रकरण मिटवण्यास कंपनीच्या काही लोकांनी सांगितल होतं. पण कंपनी त्यासाठी तयार नव्हती, असं साजन यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

पेमेंटला उशिर झाल्याने PATI-BEL कंपनीच्या ठेकदार आणि मजुरांनी आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं. ठेकेदार आणि मजदुरांची थकीत रक्कम देण्यासाठी ली सी बीन यांनी बंगळुरू येथील कंपनीच्या दुसऱ्या प्रकल्पातील रकमेचा वापर केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देय रक्कम थकवली गेली आणि लाच मागितल्या गेल्यामुळे ली सी बीन यांच्यावर दबाव वाढत होता, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर 2006 मध्ये साजन यांनी आयुष्य संपवलं होतं. त्यामुळे या घटनाक्रमाला साजन यांच्या टोकाच्या निर्णयाशी जोडून पाहिलं जात आहे.

साजन यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. या लाचखोरी प्रकरणाची 2006 मध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी व्हिजिलन्सने ज्यांना लाचखोरी प्रकरणाची थेट माहिती आहे, त्या लोकांची चौकशी केली नव्हती, असं या चिठ्ठीत म्हटलं होतं.

दरम्यान, आता या प्रकरणावर व्हिजिलन्सची चौकशी होणार आहे. देशभरात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण असतानाच या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ही तक्रार आणि एसआयआर हे दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत. मात्र, ज्ञानेश कुमार यांच्यावर झालेल्या लाचखोरीची अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाची अजून चौकशी व्हायची बाकी आहे. ज्ञानेश कुमार यांची या आरोपांवर सध्या कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही.

Follow Us
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?