AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 वर्षांपासून या गावात वाजवले जात नाहीत दिवाळीमध्ये फटाके, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

ना सरकारी नियम, ना कोणाचे बंधन. तरी देखील गेल्या 100 वर्षांपासून या गावात दिवाळीमध्ये फटाके वाजवले जात नाहीत. कारण ऐकून तुम्ही देखील कराल कौतुक.

100 वर्षांपासून या गावात वाजवले जात नाहीत दिवाळीमध्ये फटाके, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 04, 2026 | 2:59 PM
Share

दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि आनंदाचा उत्सव डोळ्यांसमोर येतो. मात्र, तमिळनाडूमधील मयिलादुथुराई जिल्ह्यातील पेरम्बूर गावात गेल्या जवळपास 100 वर्षांपासून दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी केली जाते. विशेष म्हणजे, यामागे कोणताही सरकारी नियम किंवा बंधन नसून गावकऱ्यांनी निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी स्वतःहून घेतलेला हा निर्णय आहे. वटवृक्षावर राहणाऱ्या शेकडो वटवाघळांना फटाक्यांच्या आवाजापासून आणि धुरापासून वाचवण्यासाठी संपूर्ण गावाने ही अनोखी परंपरा जपली आहे.

पेरम्बूर गावातील ‘वव्वाल थोप्पू’ म्हणजेच वटवाघळांची बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात सुमारे 150 वर्षे जुना वटवृक्ष आहे. या झाडावर शेकडो ‘इंडियन फ्लाइंग फॉक्स’ प्रजातीची मोठी फळभक्षी वटवाघळे वास्तव्यास आहेत. गावकऱ्यांनी या वटवाघळांना आपल्या कुटुंबाचा आणि गावाच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग मानले आहे.

वटवाघळांच्या संरक्षणासाठी फटाक्यांना कायमचा नकार

वटवाघळे दिवसा झाडांवर विश्रांती घेतात आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अशा वेळी फटाक्यांचा मोठा आवाज आणि त्यातून निर्माण होणारा धूर त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला.

गेल्या अनेक पिढ्यांपासून गावात दिवाळीच्या दिवशी फक्त दिवे लावले जातात आणि मंदिरांमध्ये पूजा-अर्चा केली जाते. स्वतःच्या आनंदासाठी मुक्या जीवांचे निवासस्थान उद्ध्वस्त होऊ नये, हीच या परंपरेमागील भावना आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यात वटवाघळांची महत्त्वाची भूमिका

वटवाघळे केवळ रात्री उडणारे जीव नसून पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. फळे खाल्ल्यानंतर त्यांच्या माध्यमातून विविध झाडांच्या बिया दूरवर पसरतात. तसेच काही प्रजाती परागीभवनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जंगलांचा विस्तार आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.

पेरम्बूरप्रमाणेच तमिळनाडूमधील काही अन्य गावांनीही वन्यजीव संरक्षणासाठी फटाक्यांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. विल्लुपुरम जिल्ह्यातील कझुपेरुम्पक्कम गावातही वटवाघळांच्या संरक्षणासाठी फटाक्यांवर बंदी पाळली जाते.

तर कोयंबतूर जिल्ह्यातील किट्टमपालयम गावात 2012 मध्ये शाळांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर शेकडो कुटुंबांनी दिवाळीत फटाके न फोडण्याचा संकल्प केला. या गावांतील नागरिक वटवाघळांना आपल्या गावचे पाहुणे मानतात आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात.

Follow Us
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...