AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅचलर पार्टीत भयंकर घडलं, बेशुद्ध पडलेल्या मित्राला चादरीत गुंडाळलं, रात्रभर नाचगाण्याचा धिंगाणा, सकाळी… त्या घटनेने नागपूर हादरलं

नागपुरात बॅचलर पार्टीत धक्कादायक घटना घडली. मित्रांच्या निष्काळजीपणामुळे 33 वर्षीय आदित्य मोहितेचा जीव गेला. तो बेशुद्ध पडल्यावर त्याला मदत करण्याऐवजी मित्रांनी त्याला बाजूला ठेवून पार्टी सुरू ठेवली. यात एका डॉक्टर मित्राचाही समावेश होता.

बॅचलर पार्टीत भयंकर घडलं, बेशुद्ध पडलेल्या मित्राला चादरीत गुंडाळलं, रात्रभर नाचगाण्याचा धिंगाणा, सकाळी… त्या घटनेने नागपूर हादरलं
क्राईम न्यूज
| Updated on: Dec 27, 2025 | 12:19 PM
Share

नागपूरमध्ये एक अतिशय भयानक आणि तितकीच दुर्दैवी घटना घडली आहे. बॅचलर पार्टीदरम्यान जो प्रकार घडला, त्याने माणुसकी नावाचा प्रकार आता अस्तित्वात आहे की नाही, असाच प्रश्न पडेल. मित्राचं लग्न ठरलं म्हणून आनंदाने त्याच्या बॅचलर पार्टीत गेलेल्या तरूणाला जीव गमावावा लागला आहे, तेही त्याच मित्रांमुळे. पार्टीत गेलेला तो तरूण बेशुद्ध पडला, त्याला मदत करण्याऐवजी, उरलेल्या मित्रांनी त्याला बाजूला ठेवून दिलं आणि रात्रभर नाचगाण्यात दंग राहिले. परिणामी त्यांच्या त्या मित्राचा, त्या तरूणाचा हकनाक बळी (Crime News) गेला. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी तोच तरूण मृतावस्थेत आढळला. काही तरूणांचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा अवघ्या 33 वर्षांच्या आदिच्य मोहितेने जीव गमावला. यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी खापा पोलिसांनी 11 मित्रांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

हा सगळा प्रकार गेल्या महिन्यात म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी घडला. मृत तरूणाची , आदित्यच्या आईने याप्रकरणी संशय व्यक्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य मोहिते (वय 33) याच्या जोएल सिंग नावाच्या मित्राचं लग्न ठरलं होतं, त्यानिमित्ताने नागपूरच्या एका फार्म हाऊसवर बॅचलर पार्टी ठेवण्यात आली होती. तिथे आदित्यसह अनेक मित्र एकत्र जमले होते. खात-पित गप्पा मारत हते, त्यांचा मजेत वेळ जात होता. मात्र तेवढ्यात आदित्य हा बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दिसलं ती आदित्य बेशुद्ध होऊन खाली कोसळला, तर शेजारच्याच टेबलवर त्याचे मित्र खात-पीत बसले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या मित्रांपैकी एक जण हा खुद्द डॉक्टर होता. आपल्या शेजारीच कोणीतरी बेशुद्ध होऊन खाली कोसळलं आहे, तरीही त्या डॉक्टरने उठून त्याची तपासणी केली, नाही त्याच्याकडे लक्षही दिलं नाही.

पार्टीमध्ये अडथळा नको म्हणून चादरीत गुंडाळलं आणि..

पण त्यापुढे त्या तरूणांनी जे केलं ते पाहून कोणाचंही मन सुन्न होईल. त्या सर्व मित्रांनी बेशुद्ध झालेल्या आदित्यला वैद्यकीय मदत तर केली नाहीच, पण बॅचलर पार्टीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी त्याला एका चादरीत गुंडाळलं आणइ फरपटत नेऊन शेजारच्या एका खोलीत टाकून दिलं, त्यानंतर परत येऊन त्यांच्या गप्पा, खाण-पिणं, टान्स यांच्या मश्गुल होते. पार्टी सुरूच होती. रात्रभर त्या खोलीत तडफडणाऱ्या आदित्यने अखेरचा श्वास कधी घेतला, याची कोणालाही फिकीर नव्हती.

अखेर सर्व जल्लोष झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास मित्रांपैकी कोणी तरी त्या खोलीत गेलं, आदित्यला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच हालचाल केली नाही. त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं, पण आधीच खूर उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं आणि सगळेच हादरले. याप्रकरणी आदित्यच्या भावाने तक्रारदाखल केली. त्यानंतर पोलिसांनी फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सर्व मित्रांचा बेजबाबदारपणा जगासमोर उघड झाा. या प्रकरणी खापा पोलिसांनी त्या अकरा मित्रांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या ते जामीनासाठी अर्ज करत असल्याची माहिती समोर आली आहे.

याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.