गुन्हेगार कुठेही असो, लपून राहू शकत नाही.. 7 रंगांच्या मदतीने इंटरपोल कसा घेतो शोध?
इंटरपोलकडून चार अधिकृत भाषांमध्ये सात रंगीत नोटीस जारी करण्यात येते. इंग्रजी, फ्रेंच, अरबी आणि स्पॅनिश या चार भाषांमध्ये नोटीस जारी केली जाते. या नोटिशींचा प्राथमिक उद्देश काय आहे आणि इंटरपोलच्या विविध नोटिशींचा अर्थ काय, ते जाणून घ्या..

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (International Criminal Police Organization) ही ‘इंटरपोल’ म्हणून जगभरात ओळखली जाते. इंटरपोल ही जगातील सर्वांत मोठी पोलीस संघटना आहे. ही संघटना 192 सदस्य देशांच्या पोलिसांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी लढण्यासाठी मदत करते. तिचं मुख्यालय फ्रान्समधील ल्योन इथं आहे. मायदेशात गुन्हे करून दुसऱ्या देशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेणं हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. गुन्हेगारी तपासाच्या संदर्भात ‘वाँटेड’ किंवा फरार असलेल्यांचा शोध ही संघटना घेते. इंटरपोलमध्ये 194 सदस्य देशांचा समावेश आहे, जे राष्ट्रीय पोलीस दलांना आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा सामना करण्यास सक्षम करण्यासाठी माहिती-शेअरिंग नेटवर्क म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. इंटरपोलच्या मुख्य कार्यांपैकी एक म्हणजे...
