AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला

उचलली जीभ, लावली दाढीला, असं करू नका! राऊतांचा शिंदेंना खोचक सल्ला

| Updated on: Feb 13, 2026 | 12:42 PM
Share

संजय राऊत यांनी परभणी महापौरपदाच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल यांची निष्ठा स्पष्ट करत, शिंदेंच्या सरकारवर गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला असे म्हटले. भाजपने मुस्लिम नगरसेवकांना दिलेल्या संधीचा दाखला देत, राऊत यांनी शिंदेंना अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

परभणीच्या महापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल यांच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांनी परभणीमध्ये ठाकरे सेनेचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले होते.

या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, “तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुस्लिम परवडला.” राऊत यांनी शिंदेंना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे १२ मुस्लिम नगरसेवक असल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणले. महाराष्ट्रातील मुस्लिम हे मराठी भाषिक असून ते घुसखोर नाहीत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. सय्यद इक्बाल हे निष्ठावान तालुकाप्रमुख असून अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करत आहेत. अशा निष्ठावान शिवसैनिकाला महापौर केल्यास गद्दारांच्या पोटात दुखणारच, असेही राऊत यांनी नमूद केले. शिंदेंनी बेजबाबदारपणे वक्तव्य करण्याऐवजी अभ्यास करावा, असे आवाहन राऊत यांनी केले.

Published on: Feb 13, 2026 12:42 PM