tv9 Marathi Special Report | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावर संभ्रम; रोहित पवार दादांसोबतच्या बैठकांचे पुरावे देणार
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर अद्याप स्पष्टता आलेली नाही. 12 फेब्रुवारी रोजी हा निर्णय जाहीर होणार असल्याचे सांगितले गेले होते, मात्र नंतर ही तारीख हुकली. रोहीत पवार यांच्या माहितीनुसार, अजित पवारांसह नेमकं काय ठरलं होतं, हे सोमवारी किंवा मंगळवारी पत्रकार परिषदेत समोर येणार आहे. तरीही, दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची दिशा येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर अद्याप स्पष्टता आलेली नाही. 12 फेब्रुवारी रोजी हा निर्णय जाहीर होणार असल्याचे सांगितले गेले होते, मात्र नंतर ही तारीख हुकली. रोहीत पवार यांच्या माहितीनुसार, अजित पवारांसह नेमकं काय ठरलं होतं, हे सोमवारी किंवा मंगळवारी पत्रकार परिषदेत समोर येणार आहे. तरीही, दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची दिशा येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. यावेळी सुनिल तटकरेंनी विलिनीकरणावरून थेट प्रश्न उपस्थित केला की, भाजपसोबत सत्तेत येण्याची तयारी आहे का? आणि कोणाचे कोणत्या पक्षात विलिनीकरण होणार आहे? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. मंत्रिपदापासून ते महामंडळांमध्येही सत्तेत वाटा न देण्यास पटेल आणि तटकरे यांची तयारी नाही. सोमवारी किंवा मंगळवारी होणारी पत्रकार परिषद नवे धमाके करण्याची शक्यता आहे. त्यात दादांच्या बैठकीतले पुरावे समोर येऊ शकतात.
Published on: Feb 13, 2026 02:05 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता

