T20 World Cup 2026: बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत झिम्बाब्वेने नोंदवले इतके विक्रम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 19व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी पराभूत केलं. यासह गुणतालिकेत मोठी उलथापालथ केली आहे. विजयासह झिम्बाब्वेच्या नावावर काही विक्रम नोंदवले गेले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 19व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय शेवटी अंगलट आला. कारण झिम्बाब्वेने विजयासाठी दिलेलं 169 धावांचं आव्हान काही ऑस्ट्रेलियाला गाठता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने 19.3 षटकात 146 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना झिम्बाब्वेने 23 धावांनी जिंकला आणि स्पर्धेतील पहिल्या उलटफेर नोंदवला. यामुळे गट ब मधील समीकरण बदललं आहे. आता ऑस्ट्रेलियाला सुपर 8 फेरी गाठण्यासाठी जर तरच्या समीकरणावर अवलंबून राहावं लागेल. इतकंच काय तर झिम्बाब्वे आणि श्रीलंकेची कामगिरी कशी राहील यावर पुढचं गणित ठरेल. असं असताना या विजयासह झिम्बाब्वे काही विक्रम नोंदवले आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत
झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व क्रिकेट फॉर्मेटमधील हा पाचवा विजय आहे. 1983 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला 13 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 5 विकेट राखून पराभूत केलं होतं. 2014 मध्ये वनडे मालिकेत 3 विकेटने मात दिली होती. 2022 मध्येही वनडे सामन्यात 3 विकेट राखून पराभूत केलं होतं. आता 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 23 धावांनी पराभूत केलं आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वे हा एकमेव संघ आहे की त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजयी सरासरी ही 100 टक्के आहे. तसं पाहिलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा भिडले होते आणि या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वेने बाजी मारली. यापूर्वी 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मात दिली होती.
A perfect two from two record for Zimbabwe against Australia in #T20WorldCup matches 👏
More on their famous win 👉 https://t.co/DGcVByz7gH pic.twitter.com/UDJdtaXPz2
— ICC (@ICC) February 13, 2026
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेचा हा चौथा विजय आहे. यापूर्वी 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाला, 2022 मध्ये आयर्लंडला, 2022 मध्ये पाकिस्तानला आणि 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे.
टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सिकंदर राजा हा झिम्बाब्वेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. तसेच यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने आतपर्यंत 103 विकेट घेतल्या आहेत. या यादीत रिचर्ड एगवारा 111 विकेटसह आघाडीवर आहे. तर ब्लेसिंग मुझरबानी 100 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
