AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

145 च्या वेगाने संकट धडकणार, शाळांना सुट्टी, गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवले, या राज्यांमध्ये अलर्ट जारी..

अक्कान चक्रीवादळाचा मोठा धोका आहे. अनेक भागात थेट अलर्ट जारी करण्यात आला. स्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यातच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून गर्भवती महिलांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.

145 च्या वेगाने संकट धडकणार, शाळांना सुट्टी, गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवले, या राज्यांमध्ये अलर्ट जारी..
Cyclone Akwan
| Updated on: Nov 17, 2026 | 1:50 PM
Share

Cyclone Akban : अक्कान चक्रीवादळ धुमाकूळ घालताना दिसत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला. पुढील काही तासात हे चक्रीवादळ अधिक घातक होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा, बंगाल आणि तामिळनाडू राज्यात या वादळापूर्वीच तयारीला सुरूवात करण्यात आली. अधिकारी अलर्ट मोडवर आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या. ओडिसा आणि आंध्र प्रदेशात परिस्थिती अधिक घातक आहे. 17 ते 18 नोव्हेंबर रोजी हे वादळ चक्रीवादळात रूपांतरीत होईल. 19 नोव्हेंबरला हे अधिक घातक बनेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ 130 प्रति किमी वेगाने आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनारी धडकेल. हवेचा वेग यावेळी 145 किमी प्रति तास असेल. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मोठा अलर्ट जारी केला.

त्यानंतर प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. 1465 किमी दूर असलेल्या या चक्रीवादळात राज्यातील अनेक भागातील थंडीही गायब झाली. या चक्रीवादळाचा थेट महाराष्ट्राला धोका नाही, पण यादरम्यान राज्यातील काही भागात पाऊल होण्याची शक्यता आहे. राज्यात दुष्काळ असून या चक्रीवादळामुळे थोडाजरी पाऊस झाला तरीही मोठा दिलासा मिळणार आहे.

तब्बल 13 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आकड्यांवरून दिसत आहे. 25 दिवसात बंगालच्या खाडीत असे तीन चक्रीवादळे तयार झालीत. यापूर्वी 2013 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी हेलेन, 23 नोव्हेंबर रोजी लहर आणि 6 डिसेंबर रोजी माडी हे चक्रीवादळ तयार झाले होते. त्याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात फायलिन वादळही आले होते. 2013 मध्ये बंगालच्या खाडीत चार चक्रीवादळ तयार झाली होती. यावेळी 3 चक्रीवादळ तयार झाली आहेत. ओडिसात स्थिती गंभीर आहे. या चक्रीवादळचा सर्वाधिक धोका हा ओडिसाला आहे.

ओडिसा सरकारने या वादळापासून निपटण्यासाठी उपायोजना सुरू केल्या आहेत. 60 टीमची स्थापना करण्यात आली. NDRF च्या 14 टीम तैनात करण्यात आल्यात. रायगडा, गंजाम, गजपती, कोरापुट, पुरी आणि मलकानगिरी येथे अधिकारी अलर्ट मोडवर आहेत. 18 ते 21 नोव्हेंबर रोजी ओडिसातील अनेक भागात अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हेच नाही तर गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही भागात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

Follow Us
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता