रेडमीचा नवीन टॅबलेट 12000mAh बॅटरीसह ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच
Redmi कंपनीचा हा 5जी टॅबलेट जानेवारीमध्ये भारतात लाँच होईल. कंपनीने या टॅबलेटच्या लाँचिंग तारखेची जाहीर केली आहे. केवळ लाँचिंग तारीखच नाही तर या टॅबलेटच्या बॅटरी डिटेल्सची माहिती देखील सांगितली आहे. चला जाणून घेऊया की हा टॅबलेट कधी आणि कोणत्या वैशिष्ट्यांसह पॅक केला जाईल.

शाओमी कंपनीचा सब-ब्रँड रेडमीचा नवीन टॅबलेट जानेवारीमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने Redmi Pad 2 Pro 5G च्या लाँच तारीख देखील जाहीर केली आहे. लाँच होण्यापूर्वी कंपनीने केवळ लाँच तारखेचीच नाही तर बॅटरीशी संबंधित तपशीलांची देखील माहिती सांगितलेली आहे. हा टॅबलेट 6 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल. या टॅबलेटमध्ये किती mAh बॅटरी क्षमता असेल आणि त्याचा डिस्प्ले किती इंच असेल ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
Mi.com वरील या टॅबलेटच्या मायक्रोसाईटवरून असे दिसून आले आहे की हा टॅबलेट 12000 mAh क्षमता असलेल्या पॉवरफूल बॅटरीसह लाँच केला जाईल. एका मार्केट रिसर्च फर्मने अहवाल दिला आहे की या टॅबलेटमध्ये 12.1 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. लाँचची तारीख जवळ येताच, कंपनी या टॅबलेटबद्दल अधिक माहिती उघड करेल.
जागतिक बाजारपेठेत प्रवेश झाला आहे
रेडमी पॅड 2 प्रो हा टॅबलेट सप्टेंबर महिन्यात निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये सादर करण्यात आला होता. कंपनीने युरोप मध्ये या टॅबलेटची किंमत बेस 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 379.9 युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 40,000 रूपयांपासून लाँच करण्यात आला आहे. तर भारतात अपेक्षित किंमत 25 हजार ते 30 हजारच्या आसपास असू शकते. या टॅबलेटमध्ये 12.1 इंचाचा 2.5 के रिझोल्यूशन डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस 500 निट्स आहे.
युरोपमध्ये या टॅबलेटमध्ये क्वालकॉम ऑक्टा-कोर 7एस जेन 4 प्रोसेसर आहे, तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 810 जीपीयू आहे. टॅबलेटमध्ये 128 जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 2 टीबी पर्यंत वाढवता येते.
उत्तम साऊंड क्वॉलिटीसाठी टॅब्लेटमध्ये डॉल्बी अॅटमॉससह क्वाड-स्पीकर सेटअप आहे आणि 300% ऑडिओ बूस्टला सपोर्ट करतो. कॅमेरा सेटअपच्या बाबतीत टॅब्लेटमध्ये 8-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. टॅब्लेट 27W रिव्हर्स चार्जिंग आणि 33W वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
