AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी युतीचं जागा वाटपावर शिक्कामोर्तब, काय ठरलं?

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर कल्याण -डोबिवली महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. या महापालिकेत शिवसेना शिंदे गट हाच मोठा भाऊ असणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी युतीचं जागा वाटपावर शिक्कामोर्तब, काय ठरलं?
युतीचं जागा वाटप ठरलं!Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 27, 2025 | 8:55 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.  निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास देखील सुरुवात झाली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत, दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे, राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची युती झाली आहे. कल्याण, डोंबिवली महापालिकेसाठी देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून, आता जागा वाटप देखील ठरल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप 50 तर शिवसेना शिंदे गट 65 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर उर्वरीत 7 जागांवर मैत्रीपूर्व लढत होणार आहे. काही प्रभागामध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर देखील झालं आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा युतीचा फॉर्म्यूला ठरवल्याची माहिती समोर येत आहे,

दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी देखील महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे, याबद्दल भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी माहिती दिली आहे. मुंबईमध्ये 128 जागा भाजप लढणार आहे, तर 79 जागा शिवसेना लढणार आहे, तर उर्वरित वीस जागांबाबत पेच कायम आहे.

दरम्यान यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यामुळे हे एक मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढत आहे,  तर राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस देखील ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसोबत युती करणार की शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?