AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात खास! ‘या’ गुणांमुळे जिंकतात प्रत्येकाचे मन, पण ‘ही’ कमतरता ठरते अडचणीची

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असल्याचे अंकशास्त्रात मानले जाते. त्यांच्या काही खास गुणांमुळे त्या सहजपणे इतरांचे मन जिंकतात. मात्र, त्यांच्या स्वभावात काही कमतरताही असतात.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात खास! ‘या’ गुणांमुळे जिंकतात प्रत्येकाचे मन, पण ‘ही’ कमतरता ठरते अडचणीची
octoberImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 07, 2026 | 1:11 AM
Share

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा असेल, ती इतरांशी कशी वागेल आणि तिची विचार करण्याची पद्धत कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्म तारखेसोबतच जन्माच्या महिन्यालाही महत्त्व दिले जाते. जन्माच्या महिन्याचा व्यक्तीच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्त्वावर काही प्रमाणात प्रभाव पडतो, अशी अंकशास्त्रीय मान्यता आहे. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींबाबतही काही खास गोष्टी सांगितल्या जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप, बोलण्याची पद्धत आणि इतरांशी संवाद साधण्याची शैली काहीशी वेगळी असू शकते. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि वेगवेगळे अनुभव घेण्याची त्यांना आवड असल्याचेही मानले जाते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या स्वभावाबद्दल अंकशास्त्र नेमके काय सांगते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची कोणती वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांच्यासाठी कोणते नंबर व रंग शुभ मानले जातात, हे जाणून घेऊया.

शुक्र आणि बुधाचा प्रभाव

अंकशास्त्रीय मान्यतेनुसार ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांवर शुक्र आणि बुधाचा प्रभाव अधिक दिसून येतो. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावी असते. हे लोक बुद्धिमान असण्यासोबतच प्रभावीपणे संवाद साधण्यातही तरबेज असतात. कोणत्याही विषयावर आपले मत स्पष्टपणे मांडण्याची त्यांची क्षमता चांगली असते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीने ते समोरच्या व्यक्तीवर सहज छाप पाडू शकतात. त्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यातही त्यांना लोकांचे सहकार्य सहज मिळू शकते.

प्रेमाच्या बाबतीत असतात भावनिक

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते, अशी मान्यता आहे. त्यांचे कम्युनिकेशन स्किल मजबूत असल्याने नात्यांमध्ये संवाद साधणे त्यांना चांगले जमते. आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलण्यासोबतच नाते टिकवून ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. जोडीदाराची काळजी घेण्याची त्यांची प्रवृत्ती असते. मात्र, आपल्या जोडीदाराबाबत ते काहीसे पझेसिव्ह किंवा हक्क गाजवणारे असू शकतात.

‘ही’ कमतरता ठरू शकते त्रासदायक

या व्यक्तींमध्ये ईर्ष्येची भावना अधिक असू शकते, असे अंकशास्त्र सांगते. इतर कोणी आपल्यापेक्षा पुढे जात असल्याचे त्यांना सहज स्वीकारता येत नाही. त्यामुळे काही वेळा त्यांच्यात स्पर्धेची भावना अधिक वाढू शकते. मात्र, हीच स्पर्धात्मक वृत्ती योग्य पद्धतीने वापरल्यास त्यांना मेहनत घेण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणाही देऊ शकते.

आलिशान जीवनशैलीची आवड

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांना आरामदायी आणि आलिशान जीवन जगायला आवडते. प्रवास, शॉपिंग आणि नवीन फॅशन ट्रेंड फॉलो करण्याची त्यांना विशेष आवड असू शकते. महागड्या आणि आकर्षक वस्तूंकडे त्यांचा कल असतो. चांगले कपडे, सुख-सुविधा आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे कमाईसोबत खर्च करण्याची सवयही अधिक असू शकते.

लकी नंबर आणि रंग कोणते?

अंकशास्त्रानुसार ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी १, ३ आणि ८ हे लकी नंबर मानले जातात. तर पिंक आणि लाइट ब्लू हे त्यांच्यासाठी शुभ रंग असल्याचे सांगितले जाते. या रंगांचा वापर आणि लकी नंबरशी संबंधित गोष्टी सकारात्मक ठरू शकतात, अशी अंकशास्त्रीय मान्यता आहे.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?