Maharashtra News LIVE : जायकवाडी जलसाठा 64 टक्क्यांवर
Maharashtra News LIVE : महाराष्ट्रातील विविध भागातील नागरिकांना दुष्काळाची झळ सहन करावी लागत आहे. या दुष्काळात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
नंदूरबारमध्ये कापसाला भाव मिळेना, शेतकऱ्यांचा कापूस घरातच
नंदूरबारमध्ये दुष्काळात पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडला आहे. कापसाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवून साठवणुकीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रतिक्विंटल १० हजारांपर्यंत मिळणारा कापसाचा भाव आता ९ हजारांखाली घसरला आहे. दुष्काळामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. चार एकरांतून अपेक्षित २२ ते २५ क्विंटलऐवजी केवळ ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळालं आहे. त्यात उत्पादन घटले आहेत. तसेच बाजारभावही घसरले आहे.
जायकवाडीचा जलसाठा 64 टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 26.7 टीएमसीने पाणीसाठा कमी झाला आहे. जायकवाडी धरणात सध्या 49.8 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 64.64 टीएमसी इतका आहे. गतवर्षी याच दिवशी 76.66 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. रब्बी हंगामासाठी डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जायकवाडीवर मराठवाड्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजा अवलंबून आहे. – त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पुढील काळात पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील विविध भागात थंडीचा कडाका वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा गेल्या चार दिवसांपासून पाच अंशाने घसरला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे तापमान 18 अंशांवर पोहोचले आहे. खाडीपट्ट्यात दाट धोक्याची चादर पसरली आहे. उक्षी गावात धुक्याचा डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा निर्माण झाला आहे. दोन डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या बावनदीवर धुक्यांच्या ढगांची चादर पाहायला मिळत आहे.
नाशिक शहरात पुन्हा एकदा थंडीत वाढ झाली आहे. शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील गारठा वाढला. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतकं आहे. दोन दिवसांपासून पारा १० अंशांवर स्थिर असून तापमानसुद्धा तिशीच्या खाली आहे. पुढील आठवडाभर नाशिक जिल्ह्यात थंडीची कमाल तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. अनेकांच्या घरावर हलक्या स्वरूपाचे धुके पसरले आहेत. राज्यासहित देश-विदेशातील घडामोडींचा आढावा जाणून घ्या
Published On - Nov 22,2026 9:02 AM
