AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhimma 3: ‘झिम्मा 3’मध्ये मोठा ट्विस्ट, यंदा बॉइज ट्रिप प्रो मॅक्स; टीझर पाहून हसू आवरणार नाही

Jhimma 3 Teaser: आतापर्यंत महिलांच्या सहलीतून रंगलेला ‘झिम्मा’चा प्रवास आता पुरुषांच्या या भन्नाट टोळीसोबत श्रीलंकेत पोहोचणार असून, या सहलीत नेमकी कोणती धमाल रंगते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Jhimma 3: 'झिम्मा 3'मध्ये मोठा ट्विस्ट, यंदा बॉइज ट्रिप प्रो मॅक्स; टीझर पाहून हसू आवरणार नाही
झिम्मा 3 Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 22, 2026 | 9:16 AM
Share

Jhimma 3 Teaser: ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’च्या भव्य यशानंतर ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा 2’मधून महिलांच्या सहलीतील मैत्री, नाती, स्वभाव आणि त्यातून रंगणारी धमाल अनुभवायला देणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा 3’मधून एक नवा धमाका घेऊन येत आहेत. मात्र यावेळी सहलीचा बेत महिलांचा नसून पुरुषांचा आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा 3’चा धमाल टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ म्हणत पुरुषांची ही भन्नाट टोळी श्रीलंकेच्या सफरीवर निघाली आहे. विशेष म्हणजे यावेळी हेमंत ढोमे केवळ लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार नसून अभिनयातूनही या धमाल टोळीचा भाग होणार आहेत.

टीझरमधूनच या सहलीची रंगतदार झलक पाहायला मिळते. कोणी उत्साही, कोणी गंभीर, कोणी मिश्कील, तर कोणी आपल्या वेगळ्याच अंदाजात वावरणारा! वय, स्वभाव, विचार, जगण्याची पद्धत आणि प्रत्येकाची पार्श्वभूमीही निरनिराळी. अशा एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या असलेल्या या मंडळींची गाठ एका सहलीच्या निमित्ताने पडली आहे. आता या सगळ्यांना एकाच छताखाली, एकाच प्रवासात आणल्यानंतर काय धमाल उडणार? कोण कोणाच्या सुरात सूर मिसळणार आणि कोण कोणाला नाकीनऊ आणणार? याची उत्सुकता टीझरमुळे अधिकच वाढली आहे. सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी कलाकारांची तगडी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

पहा टीझर-

महिलांच्या सहलीतून नात्यांचं, मैत्रीचं आणि भावविश्वाचं अनेक रंग उलगडणाऱ्या ‘झिम्मा’ मालिकेत यावेळी पुरुषांच्या मैत्रीचा, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा आणि एकमेकांशी जुळवून घेताना होणाऱ्या गंमतीजमतींचा नवा पट उलगडणार आहे. श्रीलंकेचे निसर्गरम्य लोकेशन्स, वेगवेगळ्या स्वभावांची ही रंगतदार जुगलबंदी आणि अनपेक्षित प्रसंगांची रेलचेल यामुळे ‘झिम्मा 3’ची ही सहल प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची भन्नाट मेजवानी ठरण्याची चिन्हे आहेत. येत्या 1 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट नववर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “’झिम्मा’ आणि ‘झिम्मा 2’ला मिळालेल्या प्रेमामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. महिलांच्या सहलीतून अनेक सुंदर गोष्टी मांडल्यानंतर यावेळी पुरुषांच्या सहलीतून त्यांच्या स्वभावातील वेगळेपण, गंमतीजंमती आणि धमाल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात 5 वर्षांनी पुन्हा अभिनय करण्याची संधीही मिळाल्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी आणखी खास आहे. वेगवेगळ्या स्वभावांची ही मंडळी एकत्र आल्यावर पडद्यावर काय रंगत येते, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. पण हा सिनेमा फक्त तिचा किंवा त्याचा न राहता सगळ्यांचा होतो.”

Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...