AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल

Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल

| Updated on: Oct 06, 2026 | 8:31 PM
Share

शिवसेना पक्षचिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी उद्धव ठाकरे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, असा युक्तिवाद केला. न्यायमूर्ती बागची यांनी अपात्रतेनंतर पक्षचिन्ह कोणाकडे जाईल, बहुमताचे निर्धारण कसे होणार आणि पक्षाच्या अंतर्गत लोकशाही रचनेबाबत अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले.

शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कौल यांनी न्यायालयासमोर नमूद केले की, उद्धव ठाकरे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत आणि त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवली नाही. अपात्रतेचा निर्णय हा याचिका दाखल केलेल्या तारखेच्या परिस्थितीवर आधारित असावा, असे त्यांनी प्रतिपादन केले. पक्षातील फूट वैध आहे की नाही, हे ठरवण्यापूर्वी अपात्रतेच्या याचिकेवर त्याचा परिणाम लावता येणार नाही, असेही कौल यांनी स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती बागची यांनी अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली. त्यांनी विचारले की, जर अपात्र ठरवलेले सदस्य पक्षातून बाहेर गेले, तर उर्वरित सदस्यांना वेगळे पक्षचिन्ह मिळते. अशा स्थितीत पक्षचिन्हाचा अधिकार कोणाला मिळायला हवा? ज्यांनी घटनात्मक पाप केले आहे, त्यांच्यासाठी की ज्यांनी त्या पापाविरोधात तक्रार केली आहे, त्यांच्यासाठी? तसेच, भारतीय राजकारणातील या गुंतागुंतीच्या परिस्थितीत निवडणूक आयोगालाही बहुमत ठरवणे कठीण आहे, मग ते कसे ठरवणार, असा प्रश्नही न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केला. कौल यांचा युक्तिवाद उद्या आणि परवाही सुरू राहणार आहे.

Published on: Oct 06, 2026 08:31 PM

Follow Us