AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी या देशात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचा पारा चढला, थेट क्षेपणास्त्र..

रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, तणाव चांगलाच वाढला. त्यामध्येच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी या देशात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, रशियाचा पारा चढला, थेट क्षेपणास्त्र..
zelenskyy visits canada
| Updated on: Dec 28, 2025 | 7:31 AM
Share

रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच हे युद्ध थांबवण्याकरिता शांतता प्रस्ताव तयार केला मात्र, त्याला युक्रेनकडून विरोध करण्यात आला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शनिवारी कॅनडामध्ये दाखल झाले. कॅनडानंतर ते अमेरिकेत दाखल होऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की सातत्याने अमेरिकेच्या दाैऱ्यावर जाताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात मीडियासमोर चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा इतकी जास्त फिस्कटली की, झेलेन्स्की थेट भर चर्चेतून उठून जाताना दिसले. झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा वादग्रस्त ठरली आणि भर पत्रकार परिषद रागात सोडून जाताना झेलेन्स्की दिसले. यावेळी लोकांनी त्यांच्या कपड्यांवरून अनेक गोष्टी बोलल्या. त्यानंतर आता पुन्हा झेलेन्स्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला जात आहेत.

अमेरिकेने दिलेला पहिला प्रस्ताव झेलेन्स्की यांनी नाकारल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावात होते. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना टार्गेट करत थेट म्हटले होते की, आतापर्यंत केलेल्या सर्व मदत विसरून आता हे आमच्याबद्दल बोलत आहेत. रशियासोबतच्या युद्धादरम्यान इतकी जास्त मदत करूनही कधी धन्यवादही अमेरिकेचे बोलले गेले नाही. यानंतर झेलेन्स्की यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

अमेरिकेसोबत असलेल्या तणावाच्या स्थितीमध्ये झेलेन्स्की अमेरिकेत पोहोचले आहेत. यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. रशिया युक्रेन युद्ध खरोखरच थांबेल का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. युक्रेन काही गोष्टींवर तटस्थ भूमिका घेत असल्याने अमेरिका संताप व्यक्त करत आहे. हेच नाही तर त्यांनी थेट झेलेन्स्की यांना जेलमध्ये टाकण्याबद्दलही मोठे भाष्य केले.

झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी निघाले असतानाच अवघ्या काही तासांपूर्वी रशियाने राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी पुन्हा एकदा हल्ले केले. रशियाने आघाडीच्या रेषेवरील वेगवेगळ्या ठिकाणी दोन शहरे ताब्यात घेऊन नवीन भूभाग मिळवल्याचा दावाही केला आहे. रशिया कोणत्याही परिस्थितीमध्ये या युद्धात झुकत नाही. नाटो देश युक्रेनला मदत करत असल्याचे जग जाहीर आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.