AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई

नरहरी झिरवाळांच्या विभागाला हादरा! एसीबीची मोठी कारवाई

| Updated on: Feb 13, 2026 | 11:08 AM
Share

मंत्रालयातील नरहरी झिरवाळांच्या अन्न व औषध प्रशासन विभागात एका क्लर्कला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली. या कारवाईने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज जिल्हा परिषद विजयी उमेदवारांच्या भेटीगाठी आणि संघटनात्मक बैठका घेणार आहेत. दरम्यान, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल असलेले शरद पवार आज डिस्चार्ज होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीने मोठी कारवाई करत एका क्लर्कला लाच घेताना अटक केली आहे. नरहरी झिरवाळ यांच्या अखत्यारीतील या विभागात राजेंद्र ढेंगरे नावाच्या क्लर्कला 35 हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी  50 हजारांची लाच मागितली होती, ज्यात तडजोड होऊन  35 हजार निश्चित झाले. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर झालेल्या या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शासकीय कामकाजातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Published on: Feb 13, 2026 11:07 AM