AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला टॅरिफमधून मोठा दिलासा?, आनंदाची बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची कोंडी, थेट 50 टक्क्यांहून..

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. धक्कादायक बाब म्हणजे जगात सर्वाधिक रशियाकडून चीन तेल खरेदी करतो. मात्र, त्या चीनवर कोणतीही कारवाई अमेरिकेने केली नाही.

भारताला टॅरिफमधून मोठा दिलासा?, आनंदाची बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची कोंडी, थेट 50 टक्क्यांहून..
India US Trade Talks
| Updated on: Dec 25, 2025 | 11:33 AM
Share

अमेरिका आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले. मात्र, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा झाल्यानंतर त्यांची भारताबद्दलची भूमिका बदलली. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचे सांगताना दिसतात तर दुसरीकडे भारतावर मोठा टॅरिफ लावतात. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण भारतावर टॅरिफ लावत असल्याचे सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतासोबत व्यापार करार करायची आहेत. भारतीय बाजारपेठ अमेरिकन वस्तूंसाठी खुला हवा आहे. मात्र, भारतही आपल्या भूमिकेवर ठाम आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या वस्तूंमुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि मला विश्वास आहे की, लवकरच पूर्ण होईल. भारत 50 टक्के टॅरिफ कमी करण्यासाठी ठाम आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिका व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात असून भारतावरील 50 टक्के टॅरिफ कमी होऊन 15 टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतो आणि याकरिता भारत आग्रही आहे.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर त्याचा परिणाम काही क्षेत्रांवर झाला असून भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, लवकरच यावर करार होऊ शकतो. पण लगेचच नेमकं कधी हे सांगणे कठीण आहे. भारताने व्यापार चर्चेदरम्यान अमेरिकेला आपला अंतिम प्रस्ताव सादर केला आहे.

भारताची इच्छा आहे की, त्याच्यावर लावण्यात आलेले एकूण 50 टक्के टॅरिफ 15 टक्क्यांपर्यंत कमी केला जावा आणि रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल लावण्यात आलेला अतिरिक्त 25 टक्के दंड रद्द केला जावा. जोपर्यंत भारतावरील टॅरिफ अमेरिका कमी करणार नाही, तोपर्यंत हे व्यापार करार होणार नाहीत, हे स्पष्टच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका व्यापार करार करण्यासाठी भारतावरील टॅरिफ कमी कमी करण्याचे थेट संकेत आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...