AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकविरुद्ध हाय व्होल्टेज सामना, पण टीम इंडिया संकटात, टेन्शन वाढलं.. काय झालं ?

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 भारताचा पुढला सामना हा पाकिस्ताविरुद्ध रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. 4 गोष्टींमुळे भारतीय संघ संकटात सापडू शकतो.

IND vs PAK : पाकविरुद्ध हाय व्होल्टेज सामना, पण टीम इंडिया संकटात, टेन्शन वाढलं.. काय झालं ?
टीम इंडियाचं वाढलं टेन्शनImage Credit source: PTI
| Updated on: Feb 13, 2026 | 11:45 AM
Share

IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणा आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम वर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. राजकीय वाद आणि बॉयकॉ करण्याची धमकी यामुळे ही मॅच पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मात्र अखेर 15 तारखेला हा सामना खेळवला जाणार आहे. असं असलं तरीही या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियासमोर काही आव्हाने आहेत. नामिबियाविरुद्ध अलिकडेच मिळालेल्या विजयानंतरही, टीम इंडिया अडचणीत सापडू शकते, त्याची 4 प्रमुख कारणं आहेत.

अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल अनिश्चिती

भारतीय संघातील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गाशी झुंजत आहे. पहिल्या सामन्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यामुळे त्याला नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि टीम मॅनेजमेंट सतर्क आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने असेही संकेत दिले की शर्माला परतण्यासाठी आणखी एक किंवा दोन सामने लागू शकतात. अशा परिस्थितीत, जर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही तर संघाचा ताण वाढू शकतो.

रिंकू सिंगचा खराब फॉर्म

मधल्या फळीत फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकू सिंगने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने 14 चेंडूत फक्त 6 धावा काढल्या. या काळात त्याने एकही फोर किंवा सिक्सर मारली नाही.  तर दुसऱ्या सामन्यात, तो 6 चेंडूत फक्त 1 धाव काढू शकला, ही टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब आहे. रिंकू सहसा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जातो, परंतु सध्या त्याची बॅट शांत असल्याचे दिसते.

स्पिनर्ससमोर फलंदाज अडचणीत

नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 209 धावा केल्या, पण मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांसमोर ते फसले. नामिबियाचा फिरकीपटू बर्नार्ड स्कोल्झ आणि गेरहार्ड इरास्मस यांनी विकेट घेतल्या आणि मधल्या षटकांमध्ये भारताची घोडदौड रोखली. याचा अर्थ असा की स्पिनर्ससमोर भारतीय फलंदाजांचा कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाला. पाकिस्तानकडे मजबूत स्पिन अटॅक आहे आणि कोलंबोची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असू शकते, ही बाब टीम इंडियासाठी एक मोठा धोका ठरू शकते.

पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीची कमजोरी

पॉवरप्लेमध्ये नामिबियाने जलद सुरुवात केली आणि भारताचे गोलंदाज सुरुवातीलाच खूप महागडे ठरले. पॉवरप्लेमध्ये धावा दिल्याने संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. नामिबियाने पहिल्या सहा षटकांत 1 गडी गमावून 57 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्ले महत्त्वाचा ठरू शकतो, तिथे त्यांचे सलामीवीर आक्रमक खेळ करू शकतात. भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर चांगलं नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पाकिस्तानी संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो.

Follow Us
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा..
ओमराजेंच्या पाठोपाठ ठाकरेंचे नगरसेवकही... धाराशिवच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा; ठाकरे गटात मोठ्या हालचाली!
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह