AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंटी पाटलांनी दंड थोपटले, भाचीच्या विरोधात प्रचार करणार, म्हणाले मविआचा उमेदवार निवडून आणणारच…

राज्यात विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणूकांच्या निमित्ताने राजकारण तापले आहे. पुण्यातील पदवीधर निवडणूक आता चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे.

बंटी पाटलांनी दंड थोपटले, भाचीच्या विरोधात प्रचार करणार, म्हणाले मविआचा उमेदवार निवडून आणणारच...
smita jadhav and satej patil
| Updated on: Oct 04, 2026 | 10:28 PM
Share

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणूकांच्या निमित्ताने राजकीय धुरळा उडाला आहे. रविवारी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाल्याने आता निवडणूकांना रंगत आली आहे. महायुतीत पुण्याच्या दोन्ही जागा भाजपाला सुटल्या आहेत. मात्र, आता येथे महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने आता येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनाला सामारे जाणाऱ्या काँग्रेसचे नेते बंटी उर्फ सतेज पाटील यांनी स्वत:च्या भाचीच्या विरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून (Pune Graduate Constituency) डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांच्या पक्षाने हर्षदा देशमुख-जाधव यांना संधी देण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही उमेदवारात टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले असतानात दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने पदवीधर मतदार संघातून मंगेश चिवटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे मंगेश चिवटे यांनी माघार न घेतल्यास येथे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

आज एमपीएससी विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनास समोरे जाणाऱ्या काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी MPSC मध्ये झालेला घोळ मुख्यमंत्र्यांना देखील मान्य झाला आहे. येथे तुम्ही क्रेडिट वॉर करू नका. विद्यार्थी कुठला पक्ष म्हणून येथे आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. म्हणजे त्यांना देखील मान्य आहे की घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करा सगळे तथ्य समोर येईल असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

भाची विरोधात दंड थोपटणार भाजपाने येथे सतेज पाटील यांची भाची स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे त्याचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले की घर फोडणे हा भाजपचा अजेंडा आहे. मात्र याचा परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. काँग्रेसने आजगावकर यांना उमेदवारी दिली आहे तर पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी मी काम करणार असे सतेज पाटील यांनी येथे सांगितले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात