मोठी बातमी! राज ठाकरेंना मोठा धक्का, 2 बडे नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला, थेट पक्ष प्रवेशाने मनसेत खळबळ
Raj Thackeray : मनसेला मोठा धक्का बसला आहे. 2 बड्या नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष मोर्चे बांधणीत व्यस्त आहेत. बैठकांना वेग आला आहे, उमेदवारांच्या याद्या अंतिम टप्प्यात आहेत. अशातच आता मनसेला मोठा धक्का बसला आहे. 2 बड्या नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर मनसेला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. हे दोन नेते कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज ठाकरेंना मोठा धक्का
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राम शिंदे, जनसंपर्क प्रमुख राज ठाकूर, मनसेचे जिल्हा सचिव ॲड.शैलेंद्र करले, भिवंडी मनसे विभाग अध्यक्ष श्रीनाथ भैरी, अनिल पवार, राजू प्रेस्थान तसेच ठाणे जिल्हा प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीचे जिल्हा सचिव कुणाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम पाटील, यश शिंदे, हनुमंत भुरके, मानवता सेवा संघाचे पदाधिकारी शिव वाघेरा, प्रतीक्षा वाघेरा, प्रियांका वाघेरा, हर्षल वाघेरा, अनिता जाधव, सरिता चारु, प्रतिभा चित्ते, शरद शिंदे यांनीही भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
📍 ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे… pic.twitter.com/kN3W0mGSeU
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 27, 2025
परेश तेलंग यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबईतही मनसेला धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 217 मधील इच्छुक उमेदवार परेश तेलंग यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मनसे पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने तेलंग यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत याचा फटका मनसेला बसण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.
