AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T-20 World Cup : टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका, हा धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरताच…ट्रॉफीसाठी हवा वेगळा प्लॅन!

सध्या जगभरात टी-20 विश्वचषक स्पर्धेची चर्चा आहे. भारत या स्पर्धेत जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. परंतु आता भारतापुढे एक खेळाडू मोठं संकट म्हणून उभं राहू शकतो.

T-20 World Cup : टीम इंडियासाठी सर्वात मोठा धोका, हा धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरताच...ट्रॉफीसाठी हवा वेगळा प्लॅन!
t 20 team indiaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 12, 2026 | 7:31 PM
Share

T-20 World Cup : सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची धूम चालू आहे. या स्पर्धेतील सामने अटीतटाची होताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक संघ ट्रॉफी मिळवण्यासाठी जीवाचे रान करतोय. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान, यावेळी भारताला अडचणीचा ठरू शकणारा एक खेळाडू चांगलाच चर्चेत आला आहे. भारताचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न या खेळाडूमुळे अधुरं राहतं की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. शेरफेन रुदरफोर्ड असं या खेळाडूचं नाव आहे.

वेस्टइंडीजचा हा खेळाडू भारतासाठी डोकेदुखी?

शेरफेन रुदरफोर्ड हा खेळाडू वेस्टइंडीज या संघातील स्टार फलंदाज म्हणून ओळखला जातो. शध्या तो चांगलाच फॉर्ममध्ये असून मैदानावर फलंदाजीसाठी आल्यावर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाहायला मिळतोय. नुकतेच 11 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि वेस्टइंडीज यांच्यात टी-20 विश्वचषकाचा 15 वा सामना झाला. या सामन्यातही रुदफोर्डने दमदार कामगिरी केली. हा सामना वेस्टइंडीजने 30 धावांनी जिंकली. वेस्टइंडीजे एकूण 196 धावा केल्या. इंग्लंडला फक्त 166 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण हाच रुदरफोर्ड हा खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे.

अवघ्या 42 चेंडूमध्ये 76 धावा

इंग्लंडविरोधातील सामन्यात रुदरफोर्ड याने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 42 चेंडूमध्ये 76 धावा केल्या. विशेष म्हणजे या सामन्यात तो नाबाद राहिला. इग्लंडच्या वेगवान तसेच फिरकीपटूंना त्याने अशरक्ष: धुतले. त्यामुळेच तो भविष्यात भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

भारताचं टेन्शन नेमकं का वाढलं?

शेरफेन रुदरफोर्ड हा खेळाडू भारतासाठी मोठं संकट असल्याचे मानले जात आहे. टी-20 विश्वचषकाच्या जेतेपदाचा भारत हा प्रबळ दावेदार आहे. आगामी काळात सुपर-8 आणि नॉकआऊट सामन्यांत भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. रुदरफोर्ड ज्या पद्धतीने वेगवान आणि फिरकीपटूंना सामोरे जाते, ती आक्रमकता पाहून भारतापुढे तो मोठे आव्हान उभे करू शकतो, असा अंदाज व्य्क्त केला जातोय. त्यामुळेच आता भारतीय संघाला रुदरफोर्डच्या कमतरता शोधाव्या लागतील. भारतीय गोलंदाजांना रुदरफोर्डची हीच कमतरता हेरून चेंडूचा मारा करावा लागेल. त्यामुळे भविष्यात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना