AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर

| Updated on: Aug 17, 2026 | 1:10 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. फडणवीसांनी केंद्र सरकारच्या योजना व प्रकल्पांबाबत सहकार्य मागितले, तसेच मोदींच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी राज्याच्या विविध विकास प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. स्वतः फडणवीस यांनी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली आहे.

फडणवीस यांच्या ट्वीटनुसार, त्यांनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांची माहिती दिली. तसेच, केंद्र सरकारच्या समन्वयातून राबवल्या जात असलेल्या योजना आणि प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून सहकार्य मागितले. फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच ही भेट नवी ऊर्जा देणारी असल्याचे म्हटले असून, मोदींच्या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या भेटीमुळे राज्याच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 17, 2026 01:05 PM

Follow Us