AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीचा अश्लील व्हिडीओ मामाच्या हाती लागला अन्.. मन सुन्न करणारी घटना, पोलिसांकडून तात्काळ कारवाई

मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आता देखील अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ज्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही? असा प्रश्न तुमच्या मनात देखील उपस्थित होईल... घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे.

मुलीचा अश्लील व्हिडीओ मामाच्या हाती लागला अन्.. मन सुन्न करणारी घटना, पोलिसांकडून तात्काळ कारवाई
फाईल फोटो
| Updated on: Aug 17, 2026 | 1:59 PM
Share

देशातील कोणत्या कोपऱ्यात मुली, महिला सुरक्षित आहेत, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. कारण मुंबईतील नालासोपाऱ्यात एक मन सुन्न करणारी घटना घडली. नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित आरोपीशी झाली. ओळख कालांतराने मैत्रीत बदलली आणि त्यांनी भेटण्याची योजना आखली. पण आपण ज्या मुलाला भेटत आहोत, त्या एका भेटीमुळे काय होईल याची कल्पना पीडितेला नव्हती. मुलगी ठरलेल्या ठिकाणी गेली…

पण त्याठिकाणी फक्त तिचा मित्रच नाही तर अन्य एक मुलगा देखील उपस्थित होता, समोर येत असलेल्या माहितीनुसार, दोन्ही कथित आरोपी अल्पवयीन आहेत. दोघांनी मुलीच्या पेयात नशेचं औषध मिसळलं आणि तिच्यावर अत्याचार केले. दोघांनी घटनेचं शुटिंग केलं आणि सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती देखील समोर येत आहे..

समोर येत असलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडीओ मुलीच्या मामाच्या हाती लागला आणि कुटुबिंयांनी नेमकं काय घडलं? याची विचरणा मुलीकडे केली, तेव्हा मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर मुलीसह कुटुंबियांनी पोलीस स्थानक गाठलं आणि तुळींज पोलीस ठाण्यात दोन आरोपीवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कथित आरोपींना अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी येथील बालसुधार गृहात ठेवण्यात आलं आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण घडलेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगायचं झालं तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हा जवळचाच व्यक्ती असतो. शिवाय सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीच्या आधारावर अनोळखी व्यक्तीला भेटणं देखील धोक्याचं ठरू शकतं. कारण सोशल मीडियामुळे फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली तर, योग्य ठरेल. त्यामुळे कोणावर डोळेबंद करुन विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा.

Follow Us
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया