AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचं टेन्शन वाढलं, आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला

मोदी सरकारचं पुन्हा टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सीजेपीनंतर आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला

मोदी सरकारचं टेन्शन वाढलं, आता दिमागी नक्षल मैदानात; थेट अभिजीत दीपकेंचा फॉर्म्युला वापरला
dimagi naxal janta party
| Updated on: Aug 17, 2026 | 1:55 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता ‘दिमागी नक्षल’वरून सोशल मीडियावर वातावरण पेटलं आहे. अभिजीत दीपके यांच्या सारखाच फॉर्म्युला वापरून ‘दिमागी नक्षल जनता पार्टी’ मैदानात उतरली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे दिमागी नक्षल जनता पार्टी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. या दिमाग नक्षल जनता पार्टीने अवघ्या 24 तासांत सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्या रत्ना सिंह यांनी म्हटलं की, मोदींनी ‘दिमागी नक्षल’चा उल्लेख केला होता. सर्व दिमागी नक्षली एकत्र आल्यास काय होईल? खरंतर याच वाक्याने अभिजीत दीपके यांनी चळवळीचा पाया घातला. सीजेपीमुळे पहिल्यांदाच मोदी सरकारमधील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला’. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान कॉक्रोच शब्दाचा वापर केला होता. त्यावेळी अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक प्रश्न विचारला होता. सर्व कॉक्रोच एकत्र आले तर काय होईल? असा सवाल दीपकेंनी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ हे पेज तयार केले होते. या पेजने अवघ्या काही दिवसांत काँग्रेस आणि भाजपच्या सोशल मीडिया फॉलोवर्सला मागे टाकलं होतं. आता दिमागी नक्षल जनता पार्टीचेही सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढताना दिसत आहेत.

 ‘दिमागी नक्षल’वरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया 

पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या वक्तव्यावरून रत्ना सिंह यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंकुर नावाच्या एका युजरने म्हटलं आहे की, ‘आयडिया अशीच आहे की, सर्व दिमागी नक्षली बाहेर यावेत. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हावी’. काही लोकांनी म्हटलं की, ‘सर्व भाजप समर्थक, राष्ट्रभक्त किंवा संघी एकत्र आल्यावर काय होईल, अशी टिप्पणी केली आहे. एकाने म्हटलं की, ‘दिमागी नक्षली’ असल्याचा अभिमान आहे. प्रश्न विचारल्याने आम्ही दिमागी नक्षली ठरत असू, तर त्या यादीत माझेही नाव घ्यावे. मी रत्ना सिंह यांच्यासोबत आहे. आमच्याकडे विचार करण्याची बुद्धी आहे’.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना