पाकिस्तानात आता शिकवले जाणार संस्कृतचे धडे, या विद्यापीठाने घेतला निर्णय
पाकिस्तानच्या लाहोर येथील एका विद्यापीठात आता संस्कृत भाषा शिकवण्यात येणार आहे. या विद्यापीठाने ४ क्रेडिटचा सर्टीफिकेटचा कोर्स सुरु केला आहे.

Sanskrit in Pakistan: आपला शेजारील देश पाकिस्तानात सध्या संस्कृतचे मंत्र घुमत आहेत. पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स (LUMS)ने तीन महिन्याच्या संस्कृतवरील वर्कशॉपनंतर आता संस्कृतचा कोर्स सुरु केलेला आहे. संस्कृतच्या वर्कशॉपला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर युनिव्हर्सिटीने हा निर्णय घेतला आहे. संस्कृतवरील कोर्स सुरु केल्यानंतर आता LUMS ची तयारी रामायण आणि गीता-महाभारत यावर संशोधन सुरु करण्याची आहे.
चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण ? किती वर्षांनी लाहोरमध्ये संस्कृत शिकवले जाणार आहे. ? संस्कृतवर कोणत्या प्रकारचा कोर्स सुरु केला जाणार आहे. रामायण आणि गीता-महाभारत यावर रिसर्च सुरु करण्याची नेमकी काय योजना आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाहोरमध्ये संस्कृतचे शिक्षण
पाकिस्तानातील लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स ( LUMS ) मध्ये तीन महिन्यांचा संस्कृतचे एक वर्कशॉप घेण्यात आले होते. त्या वर्कशॉपमध्ये संस्कृत व्याकरणापासून अध्ययनापर्यंत विस्तृत चर्चा झाली. त्यानंतर संस्कृतचा कोर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात संस्कृत शिकवण्याचा हा निर्णय इंग्रजांनी स्वातंत्र्य दिल्यानंतर प्रथमच होत आहे.
पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स (LUMS) ने हा संस्कृत कोर्स सुरु केलेला आहे. हा कोर्स चार-क्रेडिटचा कोर्स आहे. हा रेग्युलर युनिव्हर्सिटी कोर्स आहे. मात्र यात जागा मर्यादित आहेत.परंतू साल २०२७ मध्ये या कोर्सच्या जागा वाढवण्याची योजना आहे. तेव्हा संस्कृत डिप्लोमा कोर्स म्हणून तो शिकवला जाणार आहे.
पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्स (LUMS)ची तयारी रामायण आणि गीता-महाभारतावर कोर्स सुरु करण्याची आहे. LUMS च्या गुरमानी सेंटरचे संचालक डॉ. अली उस्मान कासमी सांगतात की येत्या १० ते १५ वर्षात पाकिस्तानात संस्कृत,गीता आणि महाभारतावर रिसर्च करणारे विद्वान तयार होतील.
संस्कृत आणि वेदांचा अभ्यास का गरजेचा ?
डॉ. कासमी यांनी पाकिस्तानसाठी संस्कृत आणि वेदांचा अभ्यास गरजेचा आहे. ते म्हणतात की अनेक इतिहासकार मानतात की या क्षेत्रातच वेदांची रचना झाली होती. त्यामुळे संस्कृत आणि वेदांचा अभ्यास गरजेचा आहे. त्यांनी सांगितले की LUMS मध्ये आता पंजाबी, पश्तो, सिंधी, बलुची, अरबी आणि फारसी शिकवली जाते. संस्कृत या भाषांतील अनेक शब्दांची जननी आहे. संस्कृत शिकल्याने संपूर्ण भाषांच्या इकोसिस्टीमला मजबूती मिळेल.
LUMS मध्ये प्राचीन संस्कृत पांडूलिपी
LUMS मध्ये संस्कृतच्या प्राचीन पांडु लिपी आहेत. या पांडु लिपींना ताडपत्रांवर लिहिलेले आहे.साल १९३० मध्ये विद्वान JCR Woolner यांनी यांचा संग्रह केलेला आहे.परंतू साल १९४७ नंतर कोणी यास हात लावलेला नाही.
