AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year ender 2025: टीम इंडिया 2 वर्ल्ड कपसह वनडे-टी 20I मध्ये ‘चॅम्पियन’, मात्र टेस्टमध्ये कसोटी, वर्षभरातील आकडेवारी कशी?

Indian Cricket Team 2025 Report Card : भारतीय पुरुष, महिला आणि महिला अंध संघाने हे वर्ष गाजवलं. मेन्स टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. तर महिला अंध संघाने टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली.

Year ender 2025: टीम इंडिया 2 वर्ल्ड कपसह वनडे-टी 20I मध्ये 'चॅम्पियन', मात्र टेस्टमध्ये कसोटी, वर्षभरातील आकडेवारी कशी?
Icc Champions Trophy and Women Odi World Cup Winner Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Dec 27, 2025 | 8:30 PM
Share

टीम इंडिया नववर्षात 2026 मध्ये मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची नववर्षातील एकूण पहिली एकदिवसीय मालिका असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि त्यानंतर 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही संघांचा या मालिकेत विजय मिळवून नववर्षाची दणक्यात सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाने सरत्या वर्षात अर्थात 2025 मध्ये काय कमावलं आणि काय गमावलं? याचा आपण सविस्तर आढावा या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20I क्रिकेटमध्ये लाजवाब कामगिरी केली. भारताने गतविजेता म्हणून आपला दबदबा कायम राखला. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि त्यानंतर शुबमन गिल या दोघांनी वनडेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने टी 20I आणि वनडेत चांगली कामगिरी केली. मात्र भारताची कसोटी क्रिकेटमध्ये तितकीच निराशाजनक कामगिरी राहिली. भारताने 2025 या वर्षात तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण किती सामने खेळले आणि त्यापैकी किती जिंकले? भारताची विजयी टक्केवारी काय राहिली? हे जाणून घेऊयात.

भारताने 2025 मध्ये मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळली. भारताला कसोटी मालिकेत पराभूत व्हावं लागलं. मात्र भारताने एकदिवसीय आणि टी 20I मालिका जिंकली आणि 2025 वर्षाचा शेवट गोड केला. टीम इंडियाने 2025 वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I अशा तिन्ही प्रकारात एकूण 46 सामने खेळले. भारताने या 46 पैकी 32 सामन्यांमध्ये मैदान मारलं. तर 10 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. भारताची विजयी टक्केवारी ही जवळपास 70 इतकी राहिली. भारताने वनडे आणि टी 20Iमध्ये अप्रतिम कामगिरी केली. भारताने अशीच कामगिरी कसोटीत केली असती तर गोडवा आणखी वाढला असता. मात्र तसं झालं नाही.

एकूण 5 खेळांडूकडून भारताचं नेतृत्व

टीम इंडियाचं 2025 या वर्षात एकूण 5 खेळाडूंना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या 5 खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. रोहित शर्मा याने निवृत्ती घेतल्यानंतर शुबमनला कसोटी संघाचं कर्णधारपद मिळालं. तर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी शुबमनला रोहितच्या जागी एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केलं. सूर्यकुमार टी 20I टीमचा पूर्णवेळ कर्णधार आहे. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल या दोघांनी शुबमन गिल याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळली.

टीम इंडियाला 2025 वर्षात 3 पैकी फक्त 1 कसोटी मालिकाच जिंकता आली. तसेच भारताने केवळ 3 टी 20I सामने गमावले. यावरुन भारताची टी 20I मधील ताकद किती आहे? हे सिद्ध होतं. तसेच भारताच्या या वर्षात केवळ 4 सामन्यांचा निकाल लागला नाही.

टीम इंडियाची टेस्टमध्ये ‘कसोटी’

टीम इंडियाला 2025 या वर्षात 10 पैकी सर्वाधिक कसोटी सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाने 5 सामने गमावले. तर 4 सामन्यात विजय मिळवता आला. भारताने 4 पैकी 2 सामने इंग्लंड विरुद्ध जिंकले. तर 2 सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं. तर भारताने इंग्लंडमध्ये 2 आणि ऑस्ट्रेलियात 1 सामना गमावला. तर मायदेशात 2 सामने गमावले.

टीम इंडिया मायदेशात ढेर

रोहितने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्ती घेतली आणि शुबमन गिल याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. भारताने शुबमनच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर भारताने मायदेशात विंडीजला लोळवलं. त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेने कमाल केली. गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने भारताला भारताताच कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करण्याची किमया केली. भारताने अशाप्रकारे मायदेशात 3 पैकी दुसरी कसोटी मालिका गमावली. भारताने त्याआधी 2025 वर्षाची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याची संधी हुकली.

टीम इंडिया वनडेत हिट

भारताने 2025 वर्षात 14 पैकी 11 एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवला. भारताने 14 पैकी 9 सामने हे द्विपक्षीय मालिकेत खेळले. भारताने इंग्लंडचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. त्यानंतर रोहितच्याच नेतृत्वात भारताने सलग 5 सामने जिंकत 23 जून 2013 नंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताने अशाप्रकारे वर्षभरात टी 20I वर्ल्ड कपनंतर आयसीसीची दुसरी ट्रॉफी जिंकली.

भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 ने गमवावी लागली. शुबमनची एकदिवसीय कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. मात्र शुबमन भारताला मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला.  त्यानंतर भारताने 2025 वर्षातील शेवटची एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली. भारताने दक्षिण आफ्रिकेला मायदेशात 2-1 ने पराभूत केलं. केएल राहुल याने या मालिकेत भारताचं नेतृत्व केलं.

सूर्यासेना टी 20I मध्ये सुपरहिट

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने टी 20I क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखला. भारताने 22 पैकी 16 सामने जिंकले. फक्त 3 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने रद्द झाले. सूर्याला फलंदाज म्हणून धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. मात्र नेतृत्वावर कुणीच बोट दाखवू शकणार नाही, अशी सूर्याने कामगिरी केली आहे.

सूर्याच्या नेतृत्वात टी 20I आशिया कप ट्रॉफी जिंकली. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला सलग 3 सामन्यांत पराभूत करुन ही ट्रॉफी जिकंली. भारताने त्या व्यतिरिक्त इंग्लंडला 4-1, ऑस्ट्रेलियाला 2-1 आणि दक्षिण आफ्रिकेला 3-1 ने पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड ब्रेक

भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सलग 14 वी टी 20I मालिका जिंकली. भारताचा हा मायदेशातील सलग नववा टी 20I मालिका विजय होता. भारताने यासह ऑस्ट्रेलियाचा सलग 8 टी 20I मालिका जिंकण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला.

महिला ब्रिगेडची ऐतिहासिक कामगिरी

रोहितनंतर हरमनप्रीत कौर हीने भारताला जल्लोष करण्याची संधी दिली. भारतीय महिला क्रिकेट टीमने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. भारताने या स्पर्धेतील साखळी फेरीत विजयी सुरुवात केली. त्यानंतर टीम इंडियाची गाडी विजयी ट्रॅकवरुन घसरली. मात्र भारताने जोरदार कमबॅक केलं आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर भारताच्या दृष्टीहीन महिला संघाने टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. दीपिका टीसी हीच्या नेतृत्वात भारताने हा वर्ल्ड कप उंचावला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.