AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS : आता संघात प्रांत प्रचारक पद नसणार, लवकरच होणार मोठे बदल, मोठी अपडेट समोर!

संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असताना आता संघात मोठे बदल होणार आहेत. तशी माहिती समोर आली आहे.

RSS : आता संघात प्रांत प्रचारक पद नसणार, लवकरच होणार मोठे बदल, मोठी अपडेट समोर!
rss changeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 27, 2025 | 8:21 PM
Share

RSS Chang : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS या संघटनेचा विस्तार देशभरात झालेले आहे. आज या संस्थेचे लक्षावधी स्वयंसेवक आहेत. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी संघाची शिबिरं आयोजित केली जातात. संघाचं मुख्यालय नागपुरात आहे. परंतु त्याचे अस्तित्त्व संपूर्ण देशभरात पाहायला मिळते. संघटनेची रचना, काम करण्याची पद्धत यामुळेच संघाचा एवढा विस्तार होऊ शकलेला आहे. असे असतानाच आता या संघटनेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झालेली असताना मोठी अपडेट समोर आली आहे. या संघटनेच्या रचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

संघात प्रांत प्रचारक हे पद नसेल

मिळालेल्या माहितीनुसार संघाला 100 वर्षे पूर्ण झालेली असताना त्याच्या कार्यप्रणालीत मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार प्रांत प्रचारकांच्या रचनेत तसेच कामाच्या व्याप्तीत बदल केला जाणार आहे. या बदलासाठी संघात एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार आता संघात प्रांत प्रचारक हे पद नसेल. त्याऐवजी विभागीय प्रचारक (संभाग प्रचारक) असतील. विभागीय प्रचारकांचे कार्यक्षेत्र हे प्रांत प्रचारकांपेक्षा कमी असेल.

नव्या रचनेनुसार काय काय बदल होणार?

मिळालेल्या माहितीनुसार संघाच्या नव्या रचनेत आता प्रत्येक राज्यात एक राज्य प्रचारक असेल. तसेच दोन शासकीय विभाग (कमिशनरी) मिळून संघाचा एक विभाग तयार होईल. उदाहरणादखल उत्तर प्रदेशात संघ ब्रज, अवध, मेरठ, कानपूर, काशी आणि गोरक्ष अशा सहा प्रांतामध्ये विभागलेला आहे. पण प्रशासनाच्या दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास उत्तर प्रदेशात एकूण 18 मंडळ आहेत. नव्या बदलानुसार आता उत्तर प्रदेशात एकूण 9 विभागीय प्रचारक असतील तसेच उत्तर प्रदेशात एक राज्य प्रचारक असेल. सध्या उत्तर प्रदेशात फक्त 6 प्रांत प्रचारक आहेत.

देशात 75 विभागीय प्रचारक

नव्या बदलानुसार संघात एकूण 11 क्षेत्र प्रचारक आहे. नव्या बदलानंतर ही संख्या 9 पर्यंत खाली येणार. या बदलानुसार देशात 75 विभागीय प्रचारक असतील. दरम्यान, सध्यातरी या बदलांसाठी फक्त प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.