अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना बैठकीत अश्रू अनावर
पुण्यातील जुन्नर तालुक्याच्या आढावा बैठकीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करत, त्यांचीच शिस्तबद्ध कार्यपद्धती पक्षात राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला, तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
पुण्यातील जुन्नर तालुक्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा आणि कार्यकर्त्यांना धीर देण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. बैठकीत बोलताना सुनेत्रा पवारांनी पदाधिकाऱ्यांसमोर एक भावनिक आवाहन केले. “अजित पवारांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे,” असे सांगत, त्यांनी अजित पवारांनी पक्षात राबवलेली काटेकोर कार्यपद्धती पुढेही सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत, सुनेत्रा पवारांनी पक्षाची ताकद कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
अजित पवार यांचं स्वप्न पूर्ण करायचयं! सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार
राज्यपाल कोट्यातील रिक्त जागा लवकरच भरणार?
विलीनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली! शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया

