AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनीचं सर्व..युतीमध्ये असताना मनसेकडून पहिल्यांदाच थेट खळबळजनक आरोप

MNS On Uddhav Thackeray : "कारवाई थतूरमथुर नसावी. प्रसिद्धीसाठी नसावी. फेरीवाला धोरण त्याची अमलबजावणी करून, कायमस्वरूपी तोडगा काढावा. उगीच Acting पुरत कोणी काही करू नये ही विनंती" असं संदीप देशपांडे म्हणाले.

MNS On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनीचं सर्व..युतीमध्ये असताना मनसेकडून पहिल्यांदाच थेट खळबळजनक आरोप
Sanjay Raut-Uddhav Thackeray (2)
| Updated on: Feb 13, 2026 | 12:53 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज मनसेची बैठक झाली. आज 10.30 वाजता राज ठाकरेंनी शिवतीर्थावर बैठक बोलवली होती. मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष बैठकीसाठी उपस्थित होते. मराठी भाषा दिनाच्या संदर्भात ही बैठक होती. “यावर्षी मराठी भाषा दिन दणक्यात साजरा करणार. ⁠शिवतीर्थ वर मराठी दिन साजरा करणार. आणखी नियोजन सुरू आहे” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. “सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लम हा झाला की, सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली का नाव घ्यायला?. उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचे सर्व कांड घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबाबत कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांचे चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. त्यामुळे अगं अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

“त्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं. चंद्रपूरमध्ये काही कारवाई होणार नाही. चंद्रपूरचे डील होणार आहे हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहीत होते. त्यात काही सरप्राइज नाही. आता फक्त ते जे बोलले ते उलट घडतय. त्यामुळे मी मारल्या सारखं करतो, तू रडल्यासारखे कर असं आहे” इतक्या स्पष्टपणे मनसेकडून संजय राऊतांवर हल्लाबोल करण्यात आला.

उगीच Acting पुरत कोणी काही करू नये ही विनंती

“चांगले रोड खोदले आहेत. सीसी रोड पुन्हा खोदतात. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न अमित ठाकरे यांनी केला आहे” असं म्युजिकल क्लस्टर रोडवर संदीप देशपांडे म्हणाले. “अनधिकृत बांगलादेशी मध्ये अनधिकृत परप्रांतीय पण Add करावं लागेल. अनधिकृत अनधिकृत आहेत, बांगलादेशी, परप्रांतीय सर्वच आहेत. कारवाई थतूरमथुर नसावी. प्रसिद्धीसाठी नसावी. फेरीवाला धोरण त्याची अमलबजावणी करून, कायमस्वरूपी तोडगा काढावा. उगीच Acting पुरत कोणी काही करू नये ही विनंती” असं संदीप देशपांडे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...