AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा मुसलमान परवडले- संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

परभणीचे नवे महापौर सय्यद इक्बाल यांच्या निवडीवरून राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी 'मुस्लिम महापौर' यावरून ठाकरे गटावर टीका केली. याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले की, "गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला." भाजपमध्येही अनेक मुस्लिम नगरसेवक असल्याचे सांगत, शिंदे केवळ हिंदू-मुस्लिम भेद करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

Sanjay Raut : तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा मुसलमान परवडले- संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
राऊतांकडून शिंदेंवर टीकास्त्रImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Feb 13, 2026 | 10:58 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झाले आहेत. इक्बाल यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 39 मतं मिळाली. त्यामुळे सय्यद इक्बाल हे महापौर झाले असून काँग्रेसचे गणेश देशमुख हे उपमहापौर झाले. मात्र याच मुद्यावर एकनाथ शिंदे यांन ठाकरे गटावर टीका केली आहे. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला, मुस्लिम महापौर झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली. त्यांच्या याच टीकेला ठाकरे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला

त्या एकनाथ शिंदेंना सांगा जरा अभ्यास करा. डोक्याला तेल वगैरे लावा , थंड डोकं होण्यासाठी आण मग अभ्यस करा. परभणीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक हे मुसलमान आहेत, हे त्यांना ( शिंदे) माहीत आहे का ? की उचलली जीभ लावली दाढीला ? टाळ्याला पण नाही, दाढीला… असा टोला राऊत यांनी हाणला.  परभणीमध्ये भाजपचे  12 नगरसेवक मुस्लिम आहेत. इतर ठिकाणी देखील असंख्य मुस्लिम नगरसेवक आहेत.  या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक मुस्लिम आहेत. ते काय घुसखोर नाहीत ना ? आमचे तालुकाप्रमुख आहेत ते. आमचे पदाधिकारी आहेत वर्षानुवर्ष काम करणारे ते. मग मुसलमान म्हणून कायकर्त्यांना काय दूर ठेवणार का ? तुमच्या सारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला असा घणाघात राऊत यांनी केला.

गद्दारांच्या पोटात दुखणारंच

तुमच्यासारख्या बेईमान गद्दारांपेक्षा, ज्यांनी ज्या ताटात खाल्लं, तिथेच तंगडी वर करणारे हे सगळे लोक… त्यापेक्षा हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. परभणीचे जे महापौर झालेत ते तालुकाप्रमुख आहे आमचा. अनेक वर्ष तो माणूस पक्षाचं काम करतोय, झिजतोय, पक्षाबरोबर राहिलेल्या अशा निष्ठावान शिवसैनिकाला जर परभणीत महापौर केलं तर गद्दारांच्या पोटात दुखणारंच, अशी टीकाही राऊतांनी केली.

शिंदे अक्षरशत्रू

तुम्ही काय मुसलमानांना तिकीटं दिली नाहीत का ? दिली ना.. भाजपने तिकीटं दिली नाही का ? दिली ना सर्वत्र. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुसलमान होते, मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश मुस्लिम होते, उत्तर प्रदेश किंवा बिहारचे राज्यपाल मुस्लिम होते, या देशाचे राष्ट्रपाती वारंवार मुस्लिम झालेले आहेत. डॉ. अब्दुल कलाम हेही मुस्लिम होते ना…. असा सवालही राऊत यांनी विचारला.

एकनाथ शिंदेंना काय माहित्ये मग ? अक्षरशत्रू आहेत ते, अक्षरशत्रू या शब्दाचा अर्थ समजून घ्या. भारतीय जनता पक्षाला परभणीत महापौर करण्याची संधी मिळाली असती ना, तर त्या 12 मधलाच एखादा मुस्लिम नगरसेवक (महापौर) झाला असता, हे लक्षात ठेवा. या देशामध्ये हिंदू-मुसलमान असं करण्यापलीकडे यांच्याकडे दुसरा कार्यक्रमच नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदेवर घणाघाती टीका केली.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.