AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News: अतिक्रमणविरोधी कारवाईने नगरसेवक धास्तावले, व्यापारीही आक्रमक, पुण्यात काय घडतंय?

महापालिका आयुक्तांनी संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका लावला. या कारवाईमुळे महापालिकेतील अनेक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या दुकानांवर कारवाई झाली आहे, त्यांनी आता नगरसेवकांकडे तगादा लावला आहे.

Pune News: अतिक्रमणविरोधी कारवाईने नगरसेवक धास्तावले, व्यापारीही आक्रमक, पुण्यात काय घडतंय?
| Updated on: Nov 20, 2026 | 8:37 PM
Share

दिपक कापरे, प्रतिनिधी: पुणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे आता नगरसेवकही धास्तावले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये अतिक्रमण कारवाई होत नसल्यामुळे नगरसेवकांनी आंदोलन करत आयुक्तांवर टीका केली होती. एवढेच नाही, तर शहरातील अतिक्रमणाला आयुक्त जबाबदार असून त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका लावला.

या कारवाईमुळे महापालिकेतील अनेक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या दुकानांवर कारवाई झाली आहे, त्यांनी आता नगरसेवकांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे ही कारवाई कशी मागे घेता येईल, याची चर्चा सभागृहातील नगरसेवकांमध्ये सुरू असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून बोलताना अरविंद शिंदे यांनी सभागृहात भाजपच्या नगरसेवकांची खिल्ली उडवली.

काय म्हणाले अरविंद शिंदे?

“पुणे शहरात अतिक्रमण कारवाई होणे गरजेचे होते. या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांमध्येंच फुट पडली आहे. कुणाचाही चेहरा न बघता…याचा माणूस की त्याचा माणूस हे न पाहता कारवाई करावी. आयुक्तांवर जो कोणी दबाव आणत असेल तर त्याला एक्सपोज केले आहे पुणे शहराची कॅपिसटी संपली आहे,” असे म्हणत काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला.

व्यापारी आक्रमक, भरपाई देण्याची मागणी!

दुसरीकडे, लक्ष्मी रोडवरील अतिक्रमण कारवाईमध्ये आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. उद्या महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत होतं असलेल्या बैठकीत भरपाई ही प्रमुख मागणी असणार आहे. पुण्यात लक्ष्मी रोडवरील सकाळपासून सुरू असलेली अतिक्रमणाविरोधी महानगरपालिकेची कारवाई आमच्यावर दडपशाही करून करण्यात आली अशा भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

तसेच कोणतीही नोटीस न देता कारवाई केली, असा आरोपही करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जागेची कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कागदपत्र देखील पाहिले नाहीत, अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त आहे का अशी देखील शंका व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे, थोडक्यात आता अतिक्रमणाच्या धडक कारवाईने पुण्यामध्ये चांगलाच वादंग पाहायला मिळत आहे.

Follow Us
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी