AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | ज्यांना धोरत नीट नेसता येत नाही... कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार

tv9 Marathi Special Report | ज्यांना धोरत नीट नेसता येत नाही… कोश्यारींच्या विधानाने नवा राजकीय वाद; राऊतांचा जोरदार पलटवार

| Updated on: Feb 13, 2026 | 12:19 PM
Share

माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. “राज ठाकरे हे पंतप्रधान मोदींना घाबरतात,” असे विधान कोश्यारी यांनी केल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली.

माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. “राज ठाकरे हे पंतप्रधान मोदींना घाबरतात,” असे विधान कोश्यारी यांनी केल्याचे सांगितले जाते. या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली. “जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, तो ठाकरेांना, मोदींना घाबरू नका असे सांगतो. मोदींना कोण घाबरतंय?” अशा शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला. तसेच कोश्यारींना पद्मभूषण देण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका करत, “असा सन्मान देणाऱ्याला बाळासाहेब ठाकरे असते तर जोड्याने मारले असते,” असेही वक्तव्य केले.

दरम्यान, कोश्यारी हे नाशिक येथे संघाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी मुंबईत पार पडलेल्या संघाच्या कार्यक्रमातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून राज ठाकरे यांनी टीका केली होती. मोदींच्या भीतीमुळेच बॉलिवूडचे कलाकार संघाच्या कार्यक्रमाला आल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. या आधीही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंसह, मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कोश्यारींवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या पद्मभूषण सन्मानावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यपाल पदावर असतानाही कोश्यारी आणि राज ठाकरे यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद नव्याने पेटला असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

Published on: Feb 13, 2026 12:19 PM