AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर पंचवटी एक्सप्रेस... मोठी अपडेट समोर

प्रवाशांसाठी विशेष सूचना! मुंबई-पुणे मार्गावरील या 6 गाड्या रद्द तर पंचवटी एक्सप्रेस… मोठी अपडेट समोर

| Updated on: Jul 06, 2026 | 9:50 AM
Share

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या तब्बल 6 महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून अनेकांना पर्यायी प्रवासाचा मार्ग शोधावा लागत आहे.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या तब्बल 6 महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून अनेकांना पर्यायी प्रवासाचा मार्ग शोधावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार डेक्कन क्वीन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तसेच आणखी एका महत्त्वाच्या गाडीची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. काही गाड्या उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दरम्यान पंचवटी एक्सप्रेस देखील उप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरून उशीराने चालवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. अचानक गाड्या रद्द झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना आात पुन्हा घराच्या दिशेने जावे लागत आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेची अधिकृत माहिती तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Published on: Jul 06, 2026 09:50 AM

Follow Us