कितीही पाणी प्यायलं तरी सारखी तहान का लागते? असू शकतो हे आजार

23 सप्टेंबर  2026

Created By: Bhakti Gothankar

आरोग्य समस्या सतत तहान लागणे म्हणजे फक्त जास्त पाणी पिण्याची गरज असेलच असे नाही. पाणी प्यायल्यानंतरही तहान लागत असेल तर त्यामागे काही आरोग्य समस्या असू शकतात.

डायबेटिझचा संकेत रक्तातील साखर वाढल्यास शरीर अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्यासाठी जास्त लघवी करू शकते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन वारंवार आणि जास्त तहान लागू शकते.

डिहायड्रेशन उष्ण हवामान, जास्त घाम येणे,व्यायाम,उलटी किंवा जुलाब यामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास सतत तहान लागू शकते.

किडनीच्या समस्या किडनी शरीरातील पाणी आणि क्षारांचे  संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते . किडनीच्या काही समस्यांमध्ये लघवीचे प्रमाण किंवा पाणी क्षारांचे संतुलन बदलू शकते.

काही औषधांमुळे तहान लागू शकते   काही औषधांमुळे तोंड कोरडे पडणे किंवा लघवीचे प्रमाण वाढते त्यामुळे तहान जास्त लागू शकते.

टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा