उन्हाळ्यात नक्की खा हे पदार्थ, शरीर राहील थंडा थंडा कूल कूल

 30 May 2024

Created By :  Manasi Mande

उन्हाळा सध्या प्रचंड वाढला आहे. अशावेळी हायड्रेटेड राहण्याची गरज असते.

 असे पदार्थ खावेत जे थंड प्रकृतीचे असतात आणि आपल्या शरीराला थंडावा देतील.

अशावेळी काही पदार्थ आवर्जून खावेत.

टरबूज, कलिंगड आणि काकडी सारख्या पदार्थांचे सेवन करावे.

शहाळ्याचं पाणी प्यावं.

दही आणि ताकाचं सेवन केल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो.

पुदीना खाल्ल्यानेही शरीराला थंडावा मिळतो.

सरबत, चटणी किंवा सलाडमध्ये देखील पुदिना वापरू शकता.

उन्हाळ्यात जास्त तेलकट-तिखट पदार्थ बिलकूल खाऊ नका.

तसेच जास्त चहा-कॉफी किंवा कोल्डड्रिंकचे सेवन टाळावे.