18 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
पावसाळा सुरू झाला की धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढते.
मात्र, महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो वर्षभर वाहत असतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात आहे धारेश्वर हा धबधबा.
या धबधब्यासमोर खोल डोह असून त्याची अचूक खोली अद्याप समजू शकलेली नाही.
हिरवीगार वनराई, शांत वातावरणामुळे या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलते.
हा धबधबा वर्षभर प्रवाहित असल्याने कोणत्याही ऋतूमध्ये येथे भेट देता येते.